AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Turkey-Syria Earthquake : बापाने लेकीला ढीगाऱ्यातून शोधून काढले, बापाचा चेहरा पाहताच तिच्या गालाची कळी खुलली

ढीगाऱ्यात दबलेली ही चिमुरडी इतक्या यातना, जखमा होऊनही कशीबशी श्वास घेत जणू बापाचीच वाटच पहात तग धरून होती, असा भावनिक व्हिडीओ पाहून वाटतेय..

Turkey-Syria Earthquake : बापाने लेकीला ढीगाऱ्यातून शोधून काढले, बापाचा चेहरा पाहताच तिच्या गालाची कळी खुलली
syria girlsImage Credit source: courtsey : the independent
| Updated on: Feb 09, 2023 | 3:54 PM
Share

दिल्ली : सिरीया आणि तुर्कीच्या भूकंपाने होत्याचे नव्हते झाले. हजोरो इमारती खाली दबलेले अनेक जीव केवळ नशीब थोर असल्याने सुदैवाने बचावले जात आहेत. अशात एका चिमुकलीच्या बचावाचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. हार्ट टचिंग व्हिडीओमध्ये एका ढीगाऱ्या खाली दबलेल्या चिमुरडीच्या गालावरची कळी बापाला पाहताच कशी खुललीय..हे पाहून जगातल्या कुठल्याही बापाच्या काळजाच कालवाकालव होईल..

सिरीयातील भूंकपात अनेक जण केवळ नशिब बलवत्तर म्हणूनच बचावले आहेत. असाच एक रेस्क्यू टीमने जाहीर केलेला एक व्हिडीओ खूपच समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.  सोमवार ६ फेब्रुवारी ७.८ रिश्टर स्केलच्या शक्तीशाली भूकंपाने तुर्की आणि उत्तर सिरीयाच्या प्रातांत अक्षरश: तबाही झाली. अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. सिरीया आणि तूर्कीत या दोन राष्ट्रांमध्ये एकूण ४,३०० जणांचा या भयानक भूकंपाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत.

या इमारतीच्या ढीगाऱ्यांखालून कित्येक तास उलटूनही काही जीव अजूनही वाचले जात आहेत. बचाव पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना अनेक जीव हेलावणारे व्हिडीओ समोर येत आहेत. ह्दय हेलावणारे हे व्हि़डीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून त्यांना पाहून मन भरून येत आहे. असाच एका पित्याच्या व्हिडीओ पाहून तर काळीज अगदी गलबलून जात आहे.

‘दि इंडीपेंडन्ट’ या वृत्तपत्राने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून आपण पार आरपार हादरून जाऊ….या व्हिडीओ खूपच भावनिक आहे. त्यास समर्पक कॅप्शनही देण्यात आली आहे. कॅप्शन मध्ये लिहीले आहे, की डॅड इज हीअर डोण्ट स्केअर, ‘ ढीगाऱ्यातून स्वत:च्या पोटच्या गोळ्याला बाहेर काढताना बापाच्या काळजात काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.. काय क्षण असेल तो असे हा व्हिडीओ पाहून वाटते.

इतक्या यातना, जखमा झालेली ही चिमुरडी कशीबशी ढीगाऱ्यात बापाची जणू वाटच पहात होती असे हसू तिच्या गालावर हलकेच उमटले आहे. सिरीयन सिव्हील डिफेन्स ज्यांना व्हाईट्स हेल्मेट्स म्हटले जाते ते ढीगारा उपसत असताना त्या छोटीला दिलासा देताना सांगत आहेत की, घाबरू नकोस बेटा तुझे डॅडी आले बघ ! आणि तिच्या धुळीने जखमांनी भरलेल्या गालावर हसू उमटते ते पाहून काय भावना आल्या असतील त्या बापाच्या मनात, असेच त्या क्षणी आपल्याला वाटते. नेटीझन्स हा हार्ट टचिंग व्हिडीओ पाहून हेलावले आहेत. त्यांनी कमेंटचा अक्षरश: पाऊसच पाडला आहे. एकाने म्हटले आहे की, ‘हार्ट ब्रेकींग’ अन्य एकाने म्हटले आहे की, ‘ थॅंक गॉड ए मिलियन’ अन्य एकाने म्हटले आहे की, ‘हर स्माईल ब्रॉट टीअर्स टू माय आईझ’

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.