Maruti Alto च्या स्पेअर पार्ट्सने भावाने बनवली Lamborghini, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video

एका 26 वर्षांच्या या तरुणाने त्याच्या कलाकारीचा नमूना सादर केला आहे. त्याने Lamborghini Huracan कारची हुबेहुब कॉपी तयार केली आहे.

Maruti Alto च्या स्पेअर पार्ट्सने भावाने बनवली Lamborghini, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video
Lamborghini viral video
| Updated on: Jan 13, 2026 | 7:06 PM

Trending News: अनेकांचा स्वप्न असते की त्याच्या घरासमोर एखादी सुपर कार असावी. परंतू लाखात एखाद्याला सुपरकार परवडू शकते. केरळातील 26 वर्षाच्या बिबिन याने घरातील जुन्या Maruti Alto च्या स्पेअर पार्ट्सने ही Lamborghini हुराकॅन सारखी सुपरकार तयार केली आहे. क्वॉलीटी एश्योरन्स प्रोफेशन म्हणून काम करणाऱ्या बिबीन याचे स्वप्न एकप्रकारे पूर्ण झाले आहे. त्याची ही Lamborghini कार पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. गॅरेजमधील जुने टाकाऊ साहित्य वापरुन बिबीन याने ही Lamborghini तयार केल्याने पाहणाऱ्या धक्का बसला आहे.

 व्हिडीओत दाखवली कार

बिबीन याने त्याची ही मॉडीफाय कार घरातच तयार केली असून त्यासाठी मारुती ऑल्टो कारचे स्क्रॅप पार्ट वापरले आहेत. ही लॅबॉर्गिनी तयार करण्याची सर्व माहिती त्याने दिली आहे.त्याने कस्टम बिल्ट सुपरकारचा संपूर्ण व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फायबर ग्लास शीट्स आणि जुन्या कारचे पार्ट्सपासून ही कार तयार केली आहे. हे सर्व पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.

ऑल्टोचे इंजिन आणि चाके

बिबीन या कारबद्दल सांगतात की त्यांनी ही लॅबॉर्गिनी मारुती सुझुकी ऑल्टोच्या चाकांवर उभी केली आहे आणि इंजिन देखील तिचेच आहे.यात लॅबॉर्गिनी स्टाईलचे स्टीअरिंग व्हील देखील अन्य एका कारमधून घेतले आहे. यात त्यांनी लॅबॉर्गिनी सारखे बटरफ्लाय डोअर देखील बसवले आहेत. हे दरवाजे वायपर मोटर आणि कार जॅकच्या मदतीने तयार केले आहे. हे सर्व एका बटणावर काम करतात.

तीन वर्षांची मेहनत

या कारला तयार करण्यासाठी तीन वर्षे लागल्याचे बिबीन याने सांगितले. त्याच्या नोकरीमुळे त्याला वेळ मिळत नसल्याने त्याने रात्रीच्या वेळी जागून ही कार तयार केली आहे. आतापर्यंत या कारला तयार करण्यास 1.5 लाख रुपये खर्च झाल्याचे त्याने सांगितले. अजूनही कारचे फिनिशिंगचे 20 ते 30 टक्के काम शिल्लक आहेत. याचे इंटेरिअर अपूर्ण आहे. या कारच्या सीटवर गादी बसवलेली नाही.

येथे पाहा व्हिडीओ –

युजरकडून शुभेच्छांचा वर्षाव –

बिबीनच्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून युजर त्याचे कौतूक करत आहेत. स्क्रॅपमधून आलिशान कार तयार करण्याची त्याची कल्पकता पाहून लोक त्याचे अभिनंदन करत आहेत. एका युजरने प्रतिक्रीया देताना म्हटले की भंगारातून आणि टाकाऊ वस्तूंपासून कल्पकपणे कार तयार करण्याच्या आर्ट वर्क आश्चर्यजनक आहे. ही मानसिकतेची गोष्ट आहे. तुम्ही खरेदी करु शकत नसला तरी स्वप्नं पाहून त्या दिशेने मार्ग शोधण्यात आल्याने हे घडल्याचे अन्य एका युजर्सने म्हटले आहे.