AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे…तो पठ्ठ्या 19 दिवस झोपलाच नाही ! अखेर गिनीज बुक वाले पण कंटाळले, जाणून घ्या असं काय झालं ?

एक व्यक्ती 19 दिवस सतत झोपली नाही. त्याची अवस्था पाहून गिनीज बुकवाल्यांनाही कंटाळा आला आणि त्यांनी असे रेकॉर्ड मोजणे बंद केले. चला जाणून घेऊया कोण होती ती व्यक्ती ?

बापरे...तो पठ्ठ्या 19 दिवस झोपलाच नाही ! अखेर गिनीज बुक वाले पण कंटाळले, जाणून घ्या असं काय झालं  ?
| Updated on: Apr 17, 2023 | 10:30 AM
Share

19 days without sleep : एखादी व्यक्ती 453 तास 40 मिनिटे म्हणजे 19 दिवस (awake for 19 days) डोळे न मिटता जागी राहिली, असे तुम्हाला सांगितले तर ? पहिल्यांदा हे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला ते खरं वाटणारंच नाही. पण अस खरंच घडलं आहे. 1986 साली रॉबर्ट मॅकडोनाल्ड (robert macdonald) नावाच्या व्यक्तीने हा पराक्रम केला आणि सर्वाधिक वेळ जागे राहण्याचा विश्वविक्रम (world record) आपल्या नावावर केला. हे यश इतकं धोकादायक होतं की जगभरात आव्हानात्मक विक्रम नोंदवणाऱ्या गिनीज बुकातल्या लोकांचाही पराभव झाला. त्यांनी असा प्रकार मोजणंच बंद करून टाकलं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, त्यानंतर सतत जागे राहणाऱ्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाही. मात्र, त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर मॅकडोनाल्डच्या या विक्रमाचाचा उल्लेख केला आहे. आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही, असेही सांगण्यात आले आहे. मात्र हा एक धोकादायक खेळ असल्याचे गिनीज बुकचे मत आहे. निद्रानाश या आजारामुळे अनेकांना अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशा प्रकारांची पुढे चर्चा झाली तर ते मानवतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसेल.

दोन विद्यार्थ्यांनीही केला होता रेकॉर्ड

युनिलाडच्या अहवालात म्हटले आहे की मॅकडोनाल्डच्या आधी 1963 मध्ये दोन विद्यार्थ्यांनी हा विक्रम केला होता. शालेय विज्ञान प्रकल्पासाठी ते 11 दिवस सतत जागे राहिले. त्यानंतर सर्वाधिक वेळ जागून राहण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला. रँडी गार्डनर आणि ब्रूस मॅकअलिस्टर नावाच्या या मुलांना हे जाणून घ्यायचे होते की, त्यांना पुरेशी झोप न मिळाल्यास त्यांच्या मेंदूवर किती परिणाम होतो. मात्र 2018 मध्ये, मॅकअलिस्टरने बीबीसीला सांगितले की, आम्ही मूर्ख होतो आणि तरुण तर बऱ्याच वेलेस मूर्खपणा करतात. पण आमच्या या कृत्यामुळे आम्हाला पुढील आयुष्यात पश्चात्ताप करावा लागेल हे माहित नव्हते. रँडी गार्डनरने हे आव्हान स्वीकारले होते, मी फक्त त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागृत राहिलो, असे मॅकअलिस्टर म्हणाले. झोप लागू नये म्हणून त्यांनी तीन रात्री भिंतीवर नोट्स लिहिण्यात घालवल्या.

झाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील स्लीप संशोधक विल्यम डिमेंट यांनी त्यांची कामगिरी नोंदवली आणि दीर्घ संशोधन केले. त्यांना असे आढळले की रॅंडी गार्डनर याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे. त्याच्यामध्ये एकाग्रतेचा अभाव होता. तसेच त्याला भ्रमही होऊ लागला होता. रॅन्डीच्या मेंदूच्या स्कॅनवरून असे दिसून आले की त्याच्या मेंदूचे काही भाग झोपेच्या अवस्थेत होते, काही भाग जागे होते. त्यानंतर अनेक वर्षांनी 2007 साली, टोनी राइट ही व्यक्ती 266 तास जागी राहिली होती. त्याला आशा होती की तो रँडीचा विक्रम मोडेल, पण तसे होऊ शकले नाही. नंतर झोपेशिवाय शरीरात आणि मानसिक स्थितीत काय बदल होतात हे त्याने सांगितले. त्याने कबूल केले की झोप न घेणे अतिशय थकवणारे आहे आणि मेंदू अजिबात काम करत नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.