एकाच वेळी चार मुलींशी लग्न, मंडपातच घेतले सात फेरे, वऱ्हाडी मात्र…
Funny Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. कधी-कधी तर असे व्हिडीओ समोर येतात, की तो पाहून लोकं हैराण होता. पण नुकताच एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिलात तर तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

Funny Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर सतत काही ना काही फोटो, व्हिडीओ व्हायरलही होत असतात. मात्र काही व्हिडीओ असे असतात, जे पाहून लोकं हैराण होतात, तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर हसणं रोखणंही मुश्किल होतं. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्ही पाहिलात तर तुम्हालाही हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विशेष काही नाही, तो तर एका लग्नाचा व्हिडीओ आहे. पण वेगळी गोष्ट म्हणजे त्या लग्नात वर अर्थात नवरा हा एकच आहे, पण वधू मात्र आहेत चार… हो , हे खरं आहे.
आजच्या काळात जिथे लोकांचं एक लग्न होणं मुश्किल झालंय, तिथे हा बहाद्दूर एकाच मांडवात 4-4 मुलींशी लग्न करतोय. एकाच मांडवात त्याने चार वधूंसोबत सप्तपदी पूर्ण केल्या.
लग्नसराईचा सीझन जोरात..
सध्या लग्नसराईचा सीझन मोठ्या जोरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनमध्ये सुमारे देशभरात लाखो लग्न होणं अपेक्षित आहे. मात्र त्याच लग्नाच्या सीझनमध्ये असा व्हिडीओ समोर आला, जो मजेशीर तर आहे, पण तोच व्हिडीओ पाहून अनेक जण हैराण झाले. लग्नमंडप सजलेला असून त्यातच एक मनुष्य १-२ नव्हे तब्बल चार मुलींसोबत लग्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्या चारही वधू एकाच मुलासोबत अगदी राजीखुशीने लग्न करत आहेत, असंही त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ऊपर वाले ने छप्पर फाड़ के दिया 😂😂 pic.twitter.com/WfctnnWTyX
— !! सरकार !! (@darshanvpathak) December 6, 2023
नेटीझन्सनी दिल्या धमाल प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि X (पूर्वीचं ट्विटर) यावरही बराच व्हायरल झाला आहे. @Darshanvpathak नावाच्या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर या व्हिडीओ वर नेटीझन्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या तरूणाची तर चांगदी आहे, त्याची मजा आहे. त्याच्या चेहऱ्यावरूनच कळतंय तो किती खुश आहे. मात्र अन्य काही युजर्सनी हा व्हिडीओ स्क्रीप्टेड वाटत असल्याचं म्हटलं आहे.
