सापाशी खेळायला गेला अन् अंगाशी आलं; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

साप हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. तो चावल्यानंतर कोणाचाही जीव जाऊ शकतो. त्यामूळे सापाशी खेळणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. पण एका व्यक्तीने हीच चूक केली, ज्यामुळे सापाने त्याच्यावर हल्लाच केला. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

सापाशी खेळायला गेला अन् अंगाशी आलं; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Viral Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 04, 2025 | 6:42 PM

साप किती धोकादायक असतात, हे कोणालाही सांगायची गरज नाही. फक्त माणसांसाठीच नव्हे तर प्राण्यांसाठीही साप धोकादायकच ठरतात. तरीही काही लोक जाणीवपूर्वक सापांशी खेळायला जातात आणि मग त्यांच्या अंगाशी येतं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा थरकाप उडेल. खरंतर, या व्हिडीओत एक व्यक्ती सापाशी खेळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, पण काही सेकंदातच अशी घटना घडते की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की जंगलाच्या मध्यभागी एक व्यक्ती उभी आहे आणि तिच्या हातात एक पकडलेला साप आहे. हा साप चिडलेला दिसत आहे. सापाने चावा घेण्यासाठी आपलं तोंड उघडलं आहे. संधी साधून साप हल्ला करणार हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, त्या व्यक्तीने पूर्ण आत्मविश्वासाने आपली जीभ बाहेर काढली आहे, कारण त्याला वाटतं की साप त्याचं काहीही बिघडवणार नाही. पण साप शेवटी जंगली असतात, ते माणसाचं ऐकतात कुठे? बस, काय झालं, सापाने अचानक त्या व्यक्तीची जीभ पकडली, ज्यामुळे त्या व्यक्तीची अवस्था खराब झाली. त्याने घाईघाईत आपली जीभ सोडवली आणि तोंडावर हात ठेवून हसायला सुरुवात केली. पण हा प्रसंग असा होता की तो पाहून सोशल मीडिया युजर्स घाबरले.

वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम

व्हिडीओ पाहून तुम्हीही घाबराल

हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर jejaksiaden या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच व्हिडीओवर 9 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून कोणी लिहिलं आहे की, ‘सापाशी मजा करणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे’, तर कोणी म्हटलं की, ‘हा माणूस कोणत्या हिमतीने असं करत होता, हे समजण्यापलीकडचं आहे.’ याशिवाय, अनेक युजर्सनी चेतावणीच्या सूरात म्हटलं की अशा प्रकारचा स्टंट करणं हा फक्त मूर्खपणा आहे, कोणत्याही परिस्थितीत असा प्रयत्न करू नये, नाहीतर तो जीवघेणा ठरू शकतो.’