Video | ‘चहापेक्षा किटली गरम!’ या म्हणीचा अर्थ या व्हिडीओत लपालाय, शिक्षिकेचा संताप पाहून लोकं भडकले

| Updated on: Jan 12, 2022 | 3:01 PM

क्षुल्लक कारणावरुन नको तेवढं भांडण वाढवत एका शिक्षिकेनं भर रस्त्यात जे केलं, ते पाहून अनेकंनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या कारला फेरीवाल्याची थोडीशी गाडी काय लागली, संतप्त झालेल्या शिक्षिकेनं आपलं सगळा संयम गमावला.

Video | चहापेक्षा किटली गरम! या म्हणीचा अर्थ या व्हिडीओत लपालाय, शिक्षिकेचा संताप पाहून लोकं भडकले
रस्त्यावरच शिक्षिकेचा राडा
Follow us on

तुम्ही म्हणाल शिक्षक म्हणजे एकदम आदर्श किंवा त्यांना सगळं भलंबुरं कळतं, अशी व्यक्ती असते. बहुतांश शिक्षक (Teacher) असे असतातही. पण सगळेच असतात, असं म्हटलं तर ते चूकच ठरेल. आता एका शिक्षकानं राईचा पर्वत केल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन नको तेवढं भांडण वाढवत एका शिक्षिकेनं भर रस्त्यात जे केलं, ते पाहून अनेकंनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या कारला फेरीवाल्याची थोडीशी गाडी काय लागली, संतप्त झालेल्या शिक्षिकेनं आपलं सगळा संयम गमावला. गरीब फेरीवाला फळविक्रेता होता. त्याच्या हातगाडीवर असलेली सगळी फळं या संतापलेल्या शिक्षिकेनं थेट रस्त्यावर भिरकावली. रस्त्यात राडा केला. जोरजोरात शिविगाळही सुरु केली. कसला आवाज ऐकू येतोय, हे पाहून आजूबाजूच्या घरांमधील लोकं खिडकीत आले. आणि सवयीप्रमाणं त्यांनी राडा दिसतो, म्हणून आपल्या मोबाईलमधून व्हिडीओ (Mobile Camera Video) काढून सोशल मीडियावर टाकला. ही सगळी घटना आता सोशल व्हिडीयावर (Social Media) व्हायरल झाली असून थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचली आहे.

नेमकं काय झालं?

घटना आहे भोपाळमधील. भोपाळच्या एका खासगी विद्यापीठात शिकवणाऱ्या एका शिक्षिकेच्या गाडीला हातगाडीचा जराची टच झाली. पण आपल्या गाडीला टच करण्याची हातगाडीवाल्याची मजलच कधी पोहोचली, या रागात शिक्षिकेनं तावातावानं आकांडतांडव रस्त्यावरच सुरु केला. इतकंच काय तर गरीब हातगाडीवाल्या फळविक्रेत्याचं सामानंही रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. इशार हसन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार फळ विक्रेता हा केविलवाणा प्रयत्न करत संतापलेल्या शिक्षिकेला समजून घालण्यासाठी विनवण्या करत होता. पण शिक्षिकेनं त्याचं जराही ऐकून न घेता सगळ्या सामानाला रस्त्यावर फेक प्रचंड नुकसान केलंय.

गाडीची काच बदलून देतो, असं वारंवार फेरीवाला शिक्षिकेला सांगत असल्याचं ऐकू येतंय. पण महिला त्याचा एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हती. दरम्यान या प्रकरणी आता परस्परविरोधी तक्रारीदेखील दाखल करण्यात आल्या आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण भोपाळच्या अयोध्यनगर इथलं असून महिलेची गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती. फळविक्रेता जात असताना चुकून त्याची हातगाडीला कारचा टच झाली. ज्यात कारच्या काचेला फटका बसला होता. या प्रकारामुळे शिक्षिकेनं तुफान राडा रस्त्यावरच घालायला सुरुवात केली.

या शिक्षिकेकडून मुलं काय शिकणार?

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. शबनब खान नावाच्या एका महिलेनं तर शिक्षिका अशी असेल, तर विद्यार्थी तिच्याकडून काय बोध घेत असतील, अशी संका उपस्थित केली आहे. तसंच या संतापलेल्या शिक्षिकेच्या वागण्यावरुन तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

काहींनी तर या शिक्षिकेवर कारवाई केली जावी अशीही मागणी केली आहे. अहंकारी शिक्षिकेला तिने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी ममता राजगढ यांनी केली आहे. दरम्यान, इंडिया टुडेच्या रवीश पालं यांनी ही घटना चार दिवस जुनी असल्याचं म्हटलंय. तसंच भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनीहीह या घटनेबद्दल गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देशही जारी केले आहेत.

संबंधित बातम्या –

Video | तो आला, सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि सगळे जागच्या जागीच थांबले! फक्त एकाला सोडून, कोण होता तो?

Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!

लग्नाचं आमंत्रण ते ही सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली स्टाइल? Video Viral