लग्नाचं आमंत्रण ते ही सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली स्टाइल? Video Viral

सध्या एका लग्नाच्या आगळ्याच आमंत्रणानं ऑनलाइन चर्चा निर्माण झालीय. हे सर्व मल्याळम सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली(Minnal Murali)पासून प्रेरित आहे. निमंत्रणाचा व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) झालाय.

लग्नाचं आमंत्रण ते ही सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली स्टाइल? Video Viral
मिन्नल मुरली (सौ. photography_athreya - इन्स्टा)

लग्न (Wedding) हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे कार्य निर्विघ्न आणि हटके पार पाडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. म्हणजेच जोडपं विविध शक्कल लढवून आपलं लग्न कसं वेगळं आणि संस्मरणीय होईल, हे पाहत असतं. लग्नाच्या आमंत्रण आणि सजावटीपासून वधू-वरांच्या प्रवेशापर्यंत हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला जातो.

ऑनलाइन चर्चा

सध्या एका लग्नाच्या आगळ्याच आमंत्रणानं ऑनलाइन चर्चा निर्माण झालीय. हे सर्व मल्याळम सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली(Minnal Murali)पासून प्रेरित आहे. निमंत्रणाचा व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) झालाय.

सुपरहिरो मिन्नल मुरली?

व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावरून चालताना दिसतेय. जेव्हा एक चोर तिचं पाकीट चोरून पळून जातो, तेव्हा सुपरहिरो मिन्नल मुरलीसारखा पोशाख घातलेला एक माणूस येतो आणि पाकीट चोरणाऱ्या चोराला पकडतो. त्यानंतर तो पुरूष त्या महिलेला मदत करतो, तिच्यासोबत वेळ घालवतो जेव्हा ती अभ्यास करते त्यावेळी घरची कामे करतो.

क्रिएटिव्हिटी

व्हिडिओचा शेवट पुरुष आणि स्त्री समोरासमोर येण्यानं होतो आणि स्क्रीनवर “सेव्ह द डेट” असे शब्द येतात. 23 जानेवारीला होणाऱ्या अमल आणि अंजूच्या लग्नासाठी हे आमंत्रण देण्यात आलंय. या क्रिएटिव्हिटीचं श्रेय फोटोग्राफर जिबिन जॉय यांना देण्यात आलंय.

यूझर्सच्या कमेंट्स

लग्नाचं आमंत्रण सोशल मीडियावर व्हायरल झालं असून 4.6 लाखांहून अधिक व्ह्यूज याला मिळाले आहेत. कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचंही याकडे लक्ष गेलं असून त्यानं लिहिलंय, की मी पाहिलेलं लग्नाचं सर्वोत्कृष्ट आमंत्रण आहे! अमल आणि अंजूचं अभिनंदन! सुपर लाइफच्या तुम्हाला शुभेच्छा! एका यूझरनं म्हटलंय, की आश्चर्यकारक कल्पना…, अब आगे शक्तिमान स्टाइल आयेगा. दुसर्‍यानं लिहिलं, “हाहा हॅट्स ऑफ द क्रिएटिव्हिटी. तिसऱ्यानं टिप्पणी दिली, की खरोखर नाविन्यपूर्ण, आवडलं

VIDEO : जेव्हा समुद्रात अचानक हवेत उडू लागतो लष्कराचा जवान; लोक म्हणतायत, कलियुगात येतेय त्रेतायुगाची फिलिंग

सापाशी मस्ती पडली भारी! अंगावर शहारे आणणारा Video होतोय Viral

Viral : मुलीसोबत स्टंट करणं पडलं महागात, हा Video पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही

Published On - 1:19 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI