AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OMG! बायकोचे वजन 128 किलो, चूकून नवऱ्यावर पडली अन्… नंतर जे घडलं सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका सुखी कुटुंबात अचानक शोक पसरला आहे. 28 किलो वजनाची मंजुळा चुकून नवऱ्याच्या अंगावर पडली. त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंब आणि परिसरदेखील हादरला...

OMG! बायकोचे वजन 128 किलो, चूकून नवऱ्यावर पडली अन्... नंतर जे घडलं सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली
128 Kg WomenImage Credit source: AI Image
| Updated on: Sep 16, 2025 | 2:08 PM
Share

आपण बॉलिवूडमधील दम लगाके हईशा हा सिनेमा पाहिला आहे. या सिनेमामध्ये एका जोडप्याची कथा दाखवली आहे. त्यामधील बायकोचे वजन हे खूप जास्त असते आणि तिचा पती एकदम फिट व स्लिम असतो. असेच एक कपल गुजरातमध्ये देखील आहे. पण बायकोच्या वजनामुळे नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. 128 किलो वजनाची मंजुळा चुकून नवऱ्याच्या अंगावर पडली. आता नेमकं काय घडलं हे वाचा सविस्तर…

गुजरातमधील राजकोट शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रामधाम सोसायटीत एका कुटुंबाचे आनंदाचे क्षण शोकात बदलले आहेत. अचानक घडलेल्या अपघातात 68 वर्षीय नटवरलाल नावाच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी मंजुला, ज्यांचे वजन 128 किलो होते, त्या पायऱ्यांवरून घसरून त्यांच्यावर पडल्या. ही घटना सकाळी सुमारे 4 वाजता घडली. त्यावेळी कुटुंबात गोंधळाचे वातावरण होते. कारण त्यांचा मुलगा आशीषला अचानक श्वास घेण्यास त्रास होत होता. मुलाची अवस्था पाहून घाबरलेली आई मंजुला, ज्या सुमारे 128 किलोच्या होत्या, घाईघाईत पायऱ्या चढत होत्या. याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या संतुलन गमावून बसल्या.

Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच…

पतीला सावरायला संधीच मिळाली नाही

मंजुळा थेट खाली उभ्या असलेल्या आपल्या पती नटवरलाल यांच्यावर पडल्या. हा पडण्याचा प्रकार इतका अचानक आणि जोरदार होता की नटवरलाल यांना सावरायलाच संधी मिळाली नाही. जास्त वजनामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तातडीने दोघांना जवळच्या रुग्णालयात नेले, पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी नटवरलाल यांना मृत घोषित केले. मंजुळा यांनाही दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण

शेजाऱ्यांनी सांगितले की, नटवरलाल आणि मंजुळा एक अतिशय सुखी कुटुंब होते. या अचानक घडलेल्या अपघाताने संपूर्ण परिसराला धक्का बसला आहे. ही घटना सर्वांसाठी एक धडा आहे, जी सांगते की विशेषतः वृद्ध आणि जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी पायऱ्यांवर आणि चालताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त वजन असल्यास पडण्याचा परिणाम आणखी धोकादायक होऊ शकतो.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.