एक असं बेट जिथे महिला विना कपडे फिरु शकतात, पुरुषांना… कुठे आहे? जाणून घ्या

जगात एक बेट असे आहे जिथे केवळ महिला असतात. या बेटावर महिला विना कपडे देखील फिरु शकतात. पुरुषांना या बेटावर एण्ट्री नसल्यामुळे त्या येथे हवा तसा आनंद घेऊ शकतात.

एक असं बेट जिथे महिला विना कपडे फिरु शकतात, पुरुषांना... कुठे आहे? जाणून घ्या
island
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 13, 2026 | 4:34 PM

जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या आगळ्यावेगळ्या नियमांसाठी ओळखली जातात. असेच एक बेट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बेटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरुषांना येण्यास सक्त मनाई आहे. हे बेट पूर्णपणे महिलांसाठी राखीव असून, महिलांना तणावमुक्त वातावरण मिळावे या उद्देशाने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. येथे महिला कोणत्याही वेळी, कशाही फिरत असतात. आता हे बेट कुठं आहे? जाणून घ्या…

कोणी केली या बेटाची सुरुवात?

फिनलंडमधील ‘सुपरशी आयलंड’ (SuperShe Island) असे या बेटाचे नाव आहे. या अनोख्या बेटाची संकल्पना अमेरिकन उद्योजिका क्रिस्टीना रोथ (Kristina Roth) यांची आहे. क्रिस्टीना यांना असे वाटले की, जेव्हा पुरुष आजूबाजूला असतात, तेव्हा महिला स्वतःकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाहीत किंवा त्या काहीशा दडपणाखाली असतात. महिलांना निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचा शोध घेता यावा आणि एकमेकींना प्रोत्साहन देता यावे, यासाठी त्यांनी हे बेट खरेदी केले.

बेटावरील सुविधा आणि उपक्रम

-हे बेट फिनलंडच्या किनारपट्टीवर वसलेले असून अत्यंत सुंदर आहे. येथे महिलांसाठी खास सोयीसुविधा उपलब्ध आहेत:

-येथे योग (Yoga), ध्यान (Meditation) आणि निरोगी जीवनशैलीवर आधारित उपक्रम राबवले जातात.

-महिलांसाठी विशेष कुकिंग क्लासेस आणि फिटनेस सेशन्सचे आयोजन केले जाते.

-निसर्गाच्या कुशीत राहण्यासाठी येथे आलिशान केबिन्स आणि साउना (Sauna) सुविधा उपलब्ध आहेत.

येथे प्रवेश कसा मिळतो?

हे बेट सर्वांसाठी खुले असले तरी, तिथे जाणे इतके सोपे नाही. या बेटावर जाण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. क्रिस्टीना रोथ स्वतः या अर्जांची छाननी करतात. केवळ त्याच महिलांना येथे प्रवेश दिला जातो ज्या खरोखरच स्वतःच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी वेळ देऊ इच्छितात. एकावेळी या बेटावर मोजक्याच महिलांना राहण्याची परवानगी दिली जाते.

पुरुष का निषिद्ध आहेत?

क्रिस्टीना यांच्या मते, हे बेट पुरुषांचा द्वेष करण्यासाठी नाही, तर महिलांना त्यांचे ‘स्त्रीत्व’ आणि ‘स्वातंत्र्य’ साजरी करण्यासाठी बनवले आहे. पुरुषांच्या उपस्थितीत महिला अनेकदा सजण्या-धजण्याकडे किंवा इतरांच्या प्रतिक्रियेकडे जास्त लक्ष देतात. मात्र, या बेटावर त्या कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे वावरू शकतात.

Follow Us