Video : वैज्ञानिकांच्या फोटोत लावला अभिनेत्याचा फोटो, पोरंही गोंधळली, शाळेतला धम्माल व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Aug 11, 2022 | 3:16 PM

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विज्ञानाचा वर्ग सुरू असताना काही मुले प्रॅक्टिकल करताना दिसत आहेत. वर्गाच्या भिंतीवर शास्त्रज्ञांचे फोटो लावण्यात आल्याचे दिसते आहे.

Video : वैज्ञानिकांच्या फोटोत लावला अभिनेत्याचा फोटो, पोरंही गोंधळली, शाळेतला धम्माल व्हिडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई : लहानपणापासून आपण बघितले असेल की, शाळेमध्ये (School) भितींवर महापुरूषांचे फोटो लावले जातात. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमध्ये महान व्यक्तींची फोटो लावले जातात. विशेषत: प्रयोगशाळेत (Laboratory) आपल्याला जगभरातील शास्त्रज्ञांचे फोटो बघायला मिळतात. मात्र, एखाद्या शाळेने शास्त्रज्ञांच्या फोटोच्या मधोमध अभिनेत्याचा फोटो लावला तर? ऐकायला विचित्रच वाटेल. परंतू खरोखरच हा प्रकार घडलायं. ज्यावर आता नेटकरी चर्चा करताना दिसत आहेत. जो व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, तो पंजाबमधील एका शाळेतील असल्याची सांगितले जात आहे. tv9 हा व्हिडीओ पंजाबमधील शाळेतीलच आहे, असा दावा करत नाही.

इथे पाहा शाळेतील व्हायरल होणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर शाळेतील प्रयोगशाळेमधील व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विज्ञानाचा वर्ग सुरू असताना काही मुले प्रॅक्टिकल करताना दिसत आहेत. वर्गाच्या भिंतीवर शास्त्रज्ञांचे फोटो लावण्यात आल्याचे दिसते आहे. यामध्ये तुम्हाला निकोला टॉसला, अल्बर्ट आइनस्टाईन यांसारख्या महान शास्त्रज्ञांची फोटो पाहायला मिळतील. पण मजेशीर गोष्ट म्हणजे या फोटोंमध्ये आणखी एक फोटो आहे, जो शास्त्रज्ञाचा नाही तर चक्क एका अभिनेत्याचा आहे.

शास्त्रज्ञांच्या फोटोमध्ये अभिनेत्याचा फोटो पाहून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

व्हिडिओच्या शेवटी, फ्रेंच दाढी आणि केस नसलेला दिसणारा माणूस प्रत्यक्षात अभिनेता ब्रायन क्रॅन्स्टन आहे, जो अमेरिकन वेब सिरीज ‘ब्रेकिंग बॅड’ मधील ‘वॉल्टर व्हाईट’ ची मुख्य भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये तो एका ड्रग पेडलरची भूमिका साकारत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. शिल्पा नावाच्या युजरने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला असून तो पंजाबचा असल्याचे सांगितले आहे.