Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच…

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी रेल्वेच्या एसी कोचमध्ये सिगारेट ओढताना दिसत आहे. लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिने... नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच...
Viral video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 15, 2025 | 3:56 PM

प्रवास करण्यासाठी अनेक लग्झरी सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरीही अनेकजण एक्सप्रेसने प्रवास करणे पसंत करतात. कारण रेल्वे ट्रेनचा प्रवास हा कायम सुखकर आणि अतिशय उत्तम मानला जातो. पण कधी कधी हा प्रवास कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद आणि भांडणात बदलतो. हे वाद किंवा भांडण कोणालाही आवडत नाही. पण घडणाऱ्या घटनांमुळे त्याला सामोके जावे लागते. सध्या सोशल असाच काहीसा एक व्हिडीओ व्हायरल होते आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या…

तुम्ही जर सोशल मीडियावर असाल, तर तुम्ही दिवसभरात अनेक व्हिडीओ पाहाता. त्यातील काही व्हिडीओमध्ये लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रेनमध्ये एकमेकांशी भांडताना किंवा वाद घालताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये सिगरेट ओढत असते. या एकाच कारणावरून रेल्वेच्या डब्ब्यात गोंधळ उडाला आहे.

वाचा: झाडाने पाडला पैशांचा पाऊस, तासभर सर्वत्र नोटाच नोटा… नोटा उचलण्यासाठी प्रचंड गर्दी, हे भारतात घडलंय; कसं?

मुलीशी वाद का झाला?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगी एसी कोचच्या सीटवर बसलेली आहे आणि फोनवर बोलत आहे. तिच्या एका हातात फोन आहे, तर दुसऱ्या हातात जळती सिगारेट आहे. तिचा काही लोकांशी वाद याच गोष्टीवरून होत आहे. कारण लोक तिला कोचच्या बाहेर जाऊन सिगरेट ओढण्यास सांगत आहेत. तेवढ्यात तिच्या लक्षात येते की कोणीतरी तिचा व्हिडीओ बनवत आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त सिगारेट ओढण्यावरून सुरू असलेला वाद आता व्हिडिीओ बनवण्यावरूनही सुरू होतो. लोक तिला बाहेर जाण्यास सांगत आहेत. ज्यासाठी ती नकार देत नाही. ती बाहेर गेलेली नाही. कदाचित याच कारणामुळे कोणीतरी तिचा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओमध्ये कोणीतरी पोलिसांना बोलावण्यास सांगते, तेव्हा मुलगी ठामपणे म्हणते की, बोलवा पोलिसांना…

रेल्वा सेवेची कमेंट

हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @Mahtoji_007 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काय झाले आहे, एक तर मुलगी आहे आणि त्यातही चालत्या ट्रेनमध्ये सिगरेट ओढत आहे. ही मुली किती खालच्या स्तरावर जात आहे.’ त्या व्यक्तीने यासोबत रेल्वे सेवेलाही टॅग केले आहे. त्यानंतर कमेंटमध्ये रेल्वे सेवेचा प्रतिसाद आहे. ज्यामध्ये याबाबत तपशील मागवण्यात आला आहे.