AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाची वरात गाढवावरून; लग्न मंडपातील फजितीचा व्हिडिओ पाहून तुमचीही हसून दमछाक होईल

सोशल मीडियामध्ये बरेच हटके आणि करमणूक करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात लग्न सोहळ्यातील धमाल मज्जा-आनंदाच्या व्हिडिओंचा ही समावेश अधिक आहे.

नवरदेवाची वरात गाढवावरून; लग्न मंडपातील फजितीचा व्हिडिओ पाहून तुमचीही हसून दमछाक होईल
नवरदेवाची वरात गाढवावरूनImage Credit source: social
| Updated on: Oct 27, 2022 | 9:12 PM
Share

लग्न म्हटलं की लग्नघरापासून ते लग्नाच्या हॉलपर्यंत जोरदार धामधूम सुरू असते. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील तरुण किंवा तरुणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याचा निश्चय करतात. हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यात तर बऱ्याच ठिकाणी लग्नाचा शाही थाटच असतो. अनेक लग्नांमध्ये घोड्यावरून वधू आणि वराची मिरवणूक काढली जाते. सदा सोशल मीडियामध्ये अशाच एका शाही लग्न सोहळ्यातील फजितीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नवरदेवाला लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी घोडा सापडला नाही. त्यामुळे आयत्या वेळी नवरदेवासाठी घोड्याऐवजी गाढवाची व्यवस्था करण्यात आली. ही वरात पाहून सर्वांचीच हसून हसून पुरती दमछाक होत आहे.

गाढवावर स्वारी, तरीही नवरदेवाचा रुबाब भारी

शक्यतो गाढवावरून वरात काढणे हा निषेधाचा प्रकार मानला जातो. ही वेळ ज्या नवरदेवावर आली, तो मात्र गाढवावरच्या वरातीने अजिबात खजील झालेला नाही.

A video of groom sitting on a donkey went viral on social media

लग्न मंडपातून घरात परतत असताना गाढवावरून स्वारी आली. मात्र तरीही नवरदेवाची ऐट भारीच होती. त्यामुळे अगदी लग्न मंडपापासून ते सध्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर या मिरवणुकीची खुमासदार चर्चा सुरू राहिली आहे.

नवरदेवाच्या फजितीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

सोशल मीडियामध्ये बरेच हटके आणि करमणूक करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात लग्न सोहळ्यातील धमाल मज्जा-आनंदाच्या व्हिडिओंचा ही समावेश अधिक आहे. त्यातही जर लग्नातील फजितीचा व्हिडिओ हाती लागला तर तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला म्हणून समजायचे.

नवरदेवाच्या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हिडिओवरती येणाऱ्या कमेंट्स ही चांगल्याच करमणूक करणाऱ्या आहेत.

ट्विटर असो वा इंस्टाग्राम सर्वच प्लॅटफॉर्म्सवर या व्हिडिओला लाईकचा भरघोस प्रतिसाद दिला जात आहे. त्यावरूनच अनेकजण व्हिडिओच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधत आहेत.

इंस्टाग्रामवर व्हिडिओवर लाईकचा अक्षरशः पाऊस

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ट्विटरच्या तुलनेत इंस्टाग्रामवर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक करण्यात आले आहेत. ‘क्या बात है सर, घोडी नहीं तो गधी सही’ असे मजेशीर कॅप्शन व्हिडिओसोबत लिहिण्यात आले आहे.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सोशल मीडियातील अख्ख विश्व या व्हिडिओवर फिदा झाले एवढं नक्की.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....