महिलेने दिला इतक्या किलोच्या बाळाला जन्म; वजन पाहून डॉक्टर झाले अचंबित

| Updated on: Jan 21, 2023 | 8:32 PM

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, आतापर्यंत सर्वात जास्त वजनाचा जन्म झालेला बाळ १०.२ किलोग्रॅमचा होता. सप्टेंबर १९५५ रोजी इटलीत त्याचा जन्म झाला होता.

महिलेने दिला इतक्या किलोच्या बाळाला जन्म; वजन पाहून डॉक्टर झाले अचंबित
Follow us on

ब्राझीलच्या (Brazil) अॅमेझान्स राज्यात एका महिलेने २ फूट लांब आणि ७ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. बाळाची उंची आणि वजन पाहून डॉक्टर (Doctor) अचंबित झाले. त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत या राज्यातला हा सर्वाधिक वजनाचा बाळ आहे. नवजात बाळाचे आणि त्याच्या आईचेही आरोग्य सुदृढ आहे. या बाळाचा जन्म १८ जानेवारीला अॅमेझान्स राज्यातील पॅरिंटीन्सच्या पाद्रे कोलंबो रुग्णालयातील सिजरीन सेक्शनमध्ये झाला. जन्म झाला त्यावेळी बाळाचं वजन ७ किलोपेक्षा जास्त होते. त्याची उंची २ फूट होती. अॅमेझान्स राज्यातला तो सर्वाधिक वजनाचा बाळ असल्याचं तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.

यापूर्वी जन्म झालेल्या बाळाचे वजन साडेपाच किलो आणि उंची १.८ फूट होती. बाळाच्या २७ वर्षीय आईचे नाव क्लीडीयन सँटोस आहे. ती नियमित प्रेगन्सी टेस्टसाठी रुग्णालयात गेली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला सिजेरीन सेक्शनमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी सँटोसने बाळाला जन्म दिला. त्याचं नाव एंगर्सन ठेवण्यात आलं.

एक वर्षाच्या बाळाच्या बरोबरचे वजन

जन्माच्या वेळी एंगर्सनची उंटी ५९ सेंटीमीटर होती. नवजात बाळाच्या सरासरी उंचीच्या ८ सेंटीमीटर अधिक होती. त्याच्या आई-वडिलांनी खरेदी केलेले कपडे हे बरोबर होत नव्हते. एंगर्सनचं वजन एक वर्षाच्या मुलाच्या बरोबर होते.

बाळ १०.२ किलोग्रॅमचा

एंगर्सनची आई सँटोस पाच बाळांची आई आहे. त्याची आई म्हणाली, मला वाटलं बाळ चार किलोचं असेल. पण, तो सात किलोचा झाला. डॉक्टरांचं मी अभिनंदन करते. मी ४० आठवड्यांची प्रेग्नंट होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, आतापर्यंत सर्वात जास्त वजनाचा जन्म झालेला बाळ १०.२ किलोग्रॅमचा होता. सप्टेंबर १९५५ रोजी इटलीत त्याचा जन्म झाला होता.