भयानक! बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला त्याने आत पाऊल टाकले… पण थेट 11 व्या मजल्यावरुन खाली पडला

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये ही लिफ्ट दुर्घटना घडली आहे. या घटनेला बिल्डरच्या निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

भयानक! बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला त्याने आत पाऊल टाकले... पण थेट 11 व्या मजल्यावरुन खाली पडला
वनिता कांबळे

|

Oct 03, 2022 | 10:49 PM

जयपुर : राजस्थानमद्ये(Rajasthan) एक भयानक दुर्घटना घडली आहे. यात एका इंजीनियरींगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. लिफ्टमुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. बटन दाबलं दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही. यामुळे तो मुलगा थेट 11 मजल्यावरुन पडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये ही लिफ्ट दुर्घटना घडली आहे. या घटनेला बिल्डरच्या निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

मृत विद्यार्थी हा मुळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो जयपूरच्या मणिपाल विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग करत होता.

कुशाग्र मिश्रा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कुशाग्र हा जयपूरमधील अजमेर रोडवरील माई हवेली अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता.

रविवारी रात्री त्यांनी 11व्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी लिफ्टचे बटण दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला, पण लिफ्ट आली नाही.

दरवाजा उघडल्यानंतर कुशाग्रने आत पाऊल टाकले. मात्र, आतमध्ये लिफ्टच नव्हती. यामुळे तो थेट 11व्या मजल्यावरून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुशाग्र लिफ्ट मधून खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला. सोसायटीचे सदस्य आवाज ऐकून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें