
जगभरात सध्या मोठ्या प्रमाणात घटस्फोट होत आहेत. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. पण तुम्हाला आज आम्ही अशा एका नात्याबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकेल. ही घटना 30 वर्षांनंतर पत्नीसमोर आली आहे. जे ऐकून त्याच्या पत्नीने लग्नाच्या 30 वर्षानंतर नवऱ्यासोबतचं नातं तोडलं आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका महिलेचं सुखी वैवाहिक आयुष्य त्या क्षणी उद्ध्वस्त होतं, जेव्हा तिला आपल्या पतीच्या एका धक्कादायक आणि घृणास्पद सवयीबद्दल सत्य समजते.
‘द मिरर’ या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, सदर महिलेला कळालं की तिचा पती अनेक वर्षांपासून तिच्या मैत्रिणी, शेजारीण आणि नातेवाईक महिलांचे वापरलेले अंतर्वस्त्र चोरी करत होता. विशेष म्हणजे, हा धक्कादायक प्रकार लग्नानंतर तब्बल 30 वर्षांनी उघडकीस आला. ज्यामुळे महिला पूर्णतः हादरून गेली.
कशी उघडकीस आली ही घटना?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पती कोणत्याही अनोळखी महिलांना लक्ष्य करत नव्हता तर आपल्याच सामाजिक वर्तुळातील महिलांवर नजर ठेवून हा प्रकार करत होता. एका अज्ञात व्यक्तीने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पत्नीने थेट पतीला जाब विचारला. सुरुवातीला नवऱ्याने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पतीने आपली चूक कबूल केली.
महिलेने सांगितले की, पतीला अंतर्वस्त्रांविषयी विचित्र आकर्षण असल्याची तिला थोडीफार कल्पना होती पण ही सवय इतक्या गंभीर आणि नैतिकतेच्या पलीकडे गेलेली असेल याची तिने कधीही कल्पना केली नव्हती.
30 वर्षानंतर मोडलं नातं
या महिलेनं आपली ओळख गोपनीय ठेवत एका काउंसलिंग वेबसाइटवर आपली व्यथा मांडली आहे. तिने सांगितलं की, ‘आता मला माझ्या पतीबद्दल लाज वाटते. ही केवळ विचित्र सवय नाही तर माझ्या विश्वासाचा आणि भावनांचा गंभीर विश्वासघात आहे. या घटनेनंतर ती स्वतःला कमी लेखू लागली आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली असून तिला आपल्या मैत्रिणींपुढे जाण्याचीही तिला भीती वाटत आहे.
मानसिक आरोग्य आणि नातेसंबंध तज्ज्ञांच्या मते, असा वर्तनप्रकार अनैतिक असून महिलांच्या खासगी आयुष्याचा गंभीर भंग करणारा आहे. जर संबंधित महिलांना या प्रकाराची माहिती मिळाली तर त्यांना तीव्र मानसिक धक्का बसू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.