
बाबा वेंगा ही भविष्यवेत्तीने जगाचा निरोप घेऊन बरीच वर्षे लोटली. जग भलेही मंगळ आणि शुक्राच्या घिरट्या घालत आहे. पण आजही लोक भविष्यातील घडामोडींविषयी, भाकिताविषयी उत्सुक असतातच. बाबा वेंगाच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. तिने केलेली अनेक भाकीतं खरी ठरली आहेत. आता ती तर जगात नाही. पण AI च्या ChatGPT ने बाबा वेगाच्या एका भाकिताशी संबंधित एका प्रश्नावर सर्वांना चकीत करणारे उत्तर दिले. त्यात अणु बॉम्बपेक्षाही मोठे असलेले अणु फ्युजन, श्रीमंत आणि गरीब यांच्या आयुष्याविषयी काही दावे करण्यात आले आहेत.
मनुष्य एआयचा गुलाम
चॅट जीपीटीला बाबा वेंगाच्या भाकिताविषयी विचारण्यात आले. त्यात 2070 पर्यंत एआय हे तंत्रज्ञान मनुष्यापेक्षाही बुद्धिमान होईल आणि सरकार आणि सैन्याला ते नियंत्रित करेल असा दावा करण्यात आला आहे. जर आताच मानवाने या तंत्रज्ञानाविषयी जागरुकता दाखवली नाही. सजग राहिले नाही तर भविष्यातील पिढ्या या एआयच्या गुलाम होतील. मनुष्य त्याच्या संवेदना, विचार क्लाऊडमध्ये अपलोड करू शकेल. मुलं लहानपणीच शक्तीशाली, बुद्धिमान असतील. तर गरिबांना नैसर्गिक पद्धतीने मुलं होतील. फ्युजन अणुशक्तीचा मोठा फायदा होईल, पण त्याचा चुकीचा वापर अनेक शहरांना बर्बाद करेल. तोपर्यंत शास्त्रज्ञ अणुबॉम्बपेक्षाही मोठे काहीतरी शोधून काढतील.
कोण किती वर्षे जगेल
तर दुसरीकडे एआय बाबा वेंगाने ही पण भविष्यवाणी केली आहे की, 2080 पर्यत शास्त्रज्ञ, एलियन्स सुक्ष्मजीव शोधतील. पण तत्कालीन कोणतेही सरकार त्याची माहिती देणार नाही. श्रीमंत 150 वर्षे जगतील. तर गरीबांचे आयुष्यमान सरासरी इतकेच असेल. एआय बाबा वेंगाने अजून एक खतरनाक भाकीत केले आहे. त्यानुसार, सायबर हँकिंगमुळे भविष्यात विद्युतच नाही तर बँकिंग व्यवस्था पण ठप्प होईल. ते मोठे संकट असेल. पण श्रीमंतांना भविष्यकाळ उज्ज्वल असण्याचा दावा एआय बाबा वेंगाने केला आहे. बाबा वेंगाच्या नावाने अनेक भाकीतं खपविण्यात येतात. त्यात एआय चॅटजीपीटीची हे भाकीत मात्र वेगळं ठरले आहे. भविष्यातील संभाव्य घाडमोडींचा आढावा चॅटजीपीटी मिळू समोर येत आहे.