AI ने केली कमाल, अडीच वर्षांपूर्वी हरवलेल्या महिलेचा शोधला पत्ता; Chatgpt मुळे झाली पुनर्भेट

संस्थेच्या सदस्यांनी त्या महिलेकडून तिच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी थोडी माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे, डिजिटल माध्यमांवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

AI ने केली कमाल, अडीच वर्षांपूर्वी हरवलेल्या महिलेचा शोधला पत्ता; Chatgpt मुळे झाली पुनर्भेट
| Updated on: Nov 14, 2026 | 2:30 PM

Thane News: सध्या एआयचा जमाना आहे.  एआयने प्रत्येक क्षेत्रात केलेली क्रांती थक्क करणारी आहे. आज प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर होतो ज्यामुळे अगदी शक्य वाटणारे कामही शक्य होते. अशातच आता एआय अन् गुगलच्या मदतीने चक्क अडीच वर्षांपूर्वी घरातून हरवलेल्या महिलेला शोधण्यात यश आलं आहे. नेमकी काय आहे ही हदयस्पर्शी स्टोरी? वाचा सविस्तर…

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मानसिक त्रासामुळे घरातून पळून गेलेल्या 45 वर्षीय झुलेखा मुखिद शेख यांची एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या कुटुंबासोबत पुन्हा भेट घडवून आणण्यात आली आहे. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गातील एका आश्रमात राहणाऱ्या या महिलेबद्दल माहिती गोळा करण्यासाठी तिच्याशी वारंवार संवाद साधला आणि त्यानंतर गूगल सर्च व चॅटजीपीटीसारख्या डिजिटल साधनांचा वापर केला. त्यानंतर परभणीत राहणाऱ्या तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, तिचा पती स्वतः आश्रमात आला आणि त्याने आपल्या पत्नीला घरी नेले.

Loading...

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की झुलेखा मुखिद शेख यांना 3 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांदूर येथील संविता आश्रमात पाठवण्यात आले होते. मुंबईतील कुर्ला येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कुलाबा पोलीस आणि चेंबूर येथील सरकारी महिला भिक्षुकगृहातील एका परिविक्षा अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर तिला आश्रमात ठेवण्यात आले होते.

जेव्हा जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसान चौरे आणि त्यांच्या टीमने झुलेखाच्या कुटुंबाशी नियमितपणे संवाद साधण्यास सुरुवात केली, तेव्हा तिच्या कुटुंबाचा शोध घेणे सुरु केलेसं. संस्थेच्या सदस्यांनी त्या महिलेकडून तिच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी थोडी माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे, डिजिटल माध्यमांवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

गुगल सर्च आणि चॅटजीपीटीच्या मदतीने शक्य झालं..

संस्थेने महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे गुगल सर्च आणि चॅटजीपीटीसारख्या डिजिटल एआय साधनांचा वापर करून तपास केला. या तपासामुळे तिच्या मूळ गावाचा आणि कुटुंबाचा शोध लागला. त्यानंतर  परभणीतील निर्भया पोलीस पथकाच्या मदतीने कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. ओळख पटल्यानंतर  कुटुंब आणि महिलेमध्ये फोनवर संभाषण घडवून आणण्यात आले.

जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चोरे म्हणाले की, सततचा संवाद आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संयोगामुळे हे शक्य झाले.  “गुगल आणि एआयसारख्या डिजिटल साधनांद्वारे संयमाने संवाद साधल्यामुळे आम्ही तिच्या मूळ गावापर्यंत पोहोचू शकलो आणि परभणीतील निर्भया पोलीस पथकाच्या मदतीने तिला तिच्या कुटुंबासोबत पुन्हा एकत्र आणण्यात यशस्वी झालो.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us