AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajmer Shariff : अजमेर शरीफ दर्ग्यातील तो रहस्यमयी दरवाजा; जो केवळ वर्षातून 4 वेळाच उघडतो, काय ती भीती खरी ठरणार?

Ajmer Shariff Dargah Door : अजमेर शरीफ दर्गा हा अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे. या दर्गाबाबत अनेक मान्यता आहेत. काही हिंदू नेते दर्गाबाबत वेगळा दावा करतात. त्याचवेळी येथील एक रहस्यमयी दरवाजा सुद्धा मोठा चर्चेचा विषय आहे. तो वर्षातून चार वेळाच उघडण्यात येतो, त्याचे कारणही तसेच विचित्र आहे.

Ajmer Shariff : अजमेर शरीफ दर्ग्यातील तो रहस्यमयी दरवाजा; जो केवळ वर्षातून 4 वेळाच उघडतो, काय ती भीती खरी ठरणार?
तो रहस्यमयी दरवाजाImage Credit source: गुगल
| Updated on: May 02, 2025 | 4:43 PM
Share

राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा, भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक प्रसिद्ध स्थळ आहे. हा दर्गा, त्याची सुफीयत, धार्मिक महत्त्व आणि रहस्यांसाठी ओळखल्या जातो. हा दर्गा सुफी संत ख्वाजा मोईनु्द्दीन चिश्ती यांचे समाधी स्थळ आहे. येथे देशभरातूनच नाही तर जगभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. या दर्गामध्ये एक रहस्यमयी दरवाजा आहे जो वर्षातून चार वेळाच उघडतो. हा दरवाजा उघडताना सुद्धा विशेष काळजी घेण्यात येते. याविषयी स्थानिकांमध्ये भीती आहे. काय आहे त्याचे कारण?

कोणता आहे तो दरवाजा?

अजमेर शरीफ दर्गाच्या मुख्य परिसरातच हा दरवाजा आहे. तो वर्षातून केवळ चार वेळा उघडतो. हा दरवाजा रहस्यमयी आहे. तो इतर वेळी मात्र बंद ठेवण्यात येतो. या दरवाज्याला गासियान दरवाजा असे म्हटले जाते. तो केवळ विशेष दिवशीच उघडण्यात येतो. हा दरवाजा मुख्य परिसरात आहे. हा दरवाजा सर्वसामान्य भाविकांसाठी कधीच उघडण्यात येत नाही. त्याविषयीच्या काही धार्मिक मान्यता आहेत.

काय आहे धार्मिक मान्यता?

धार्मिक मान्यतांमुळे या दरवाज्याचे गूढ कायम आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या काळापासून हा दरवाजा अस्तित्वात आहे. तो काही विशिष्ट लोकांसाठीच उघडण्यात येत असे. या सुफी संताविषयी ज्याच्या मनात अतोनात श्रद्धा आणि भक्ती होती, त्याच्यासाठीच हा दरवाजा उघडत असे. सध्या हा दरवाजा सुफी संताची जयंती, उर्स आणि काही महत्त्वाच्या दिवशी उघडण्यात येतो.

ती भीती काय?

हा दरवाजा वर्षभर बंद ठेवण्यामागे आणि विशिष्ट दिवशीच तो उघडण्यामागे एक मोठी भीती आहे. दरवाजा वर्षातून केवळ चार वेळा उघडण्यात येतो. तो सर्वसामान्य भाविकांसाठी उघडण्यात येत नाही. दरवाजा उघडा ठेवल्यास दर्गामध्ये वाईट घटना घडण्याची भीती कायम आहे. या परिसरात भूत, प्रेतात्मा यांची शक्ती वाढण्याची भीती आहे. त्यांचा प्रभाव वाढू शकतो, असे स्थानिक सांगतात. हा दरवाजा उघडल्यावर काही तरी विचित्र घटना घडल्याचे स्थानिक सांगतात. याविषयीचा अनुभव घेतल्याने अनेकजण सामान्य भाविकांना त्यावेळी दूर ठेवतात. हा दरवाजा उघडताना पण विशेष काळजी घेण्यात येते. नकारात्मक शक्ती सक्रिय होऊ नये याची काळजी घेण्यात येते.

डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्त्रोतांआधारे देण्यात आली आहे. या माहितीची पुष्टी अथवा दुजोरा टीव्ही ९ मराठी देत नाही.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?