या दिग्गज खेळाडूमुळे श्रीसंतला वनवास; हीच ती चूक, ज्यामुळे क्रिकेटवर तीन वर्षांसाठी बॅन
S Sreesanth Ban : भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत याची खेळी आणि आयुष्य वादळीच ठरलं आहे. कमी वयात त्याला यशाने गवसणी घातली. त्यानंतर त्याने कशा कशाला आणि कोणा कोणाला काय काय गवसणी घातली याचे किस्से कमी नाहीत. ही चूक त्याला महागात पडली.

केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) माजी भारतीय क्रिकेटर एस. श्रीसंत याच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घातली. त्यामुळे तो आता क्रिकेटशी संबंधित कोणतेच काम करू शकणार नाही. यामागे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेटर संजू सॅमसन हा असल्याचा दावा करण्यात येत आहे. श्रीसंत याने सॅमसन याला पाठिंबा देण्यासाठी KCA वर टीकेची झोड उठवली होती. त्याने असोसिएशनवर अनेक आरोप लावले होते. ही चूक त्याच्या मुळावर आली. केसीएने लागलीच त्याच्यावर कारवाई केली. इतकेच नाही तर संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ, रेजी लुकोस आणि एका वृत्त वाहिनीच्या वृत्त निवेदकावर सुद्धा कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे केरळ क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर बदनामी केली म्हणून दंड आकारण्यात येणार असल्याचे समजते.
हे प्रकरण तरी काय?
एस. श्रीसंत आणि केसीए यांच्यात संजू सॅमसन याच्यावरून वाद पेटला. वादामुळे संजूला केरळच्या विजय हजारे ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर चॅम्पियस ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे श्रीसंत भडकला. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत संजूला बाजूला केल्याने केसीएवर आरोपांच्या फेरी झाडल्या. संजू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला खेळाडू आहे. पण केसीएच्या धोरणामुळे त्याला राष्ट्रीय संघात घेण्यात आले नाही. केसीए संजू सारखा दुसरा खेळाडू अद्याप तयार करू शकले नाही असा टोलाही त्याने लगावला. केरळकडे सचिन, निदीश आणि विष्णू विनोद सारखे खेळाडू असूनही त्यांना संधी देण्यात येत नसल्याचा आरोप त्याने केला. त्याच्या या आरोपाला केसीएन पण खरमरीत उत्तर दिले. श्रीसंत 2013 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात सापडला होता. नेमका हाच धागा पकडत आम्ही खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देतो, ते तुरुंगात असताना सुद्धा, असा खरमरीत टोला केसीएने श्रीसंत याला लगावला.
तीन वर्षांसाठी बंदी
KCA ने यानंतर केरळ प्रीमियर लीगची फ्रेंचाईजी कोल्लम एरीजचा मालक श्रीसंत याच्यासह एलेप्पी टीम लीड कंटेंट क्रिएटर साई कृष्णन, एलेप्पी रिपल्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. श्रीसंत वगळता इतर दोघांनी त्याला समाधानकारक उत्तर दिले. श्रीसंत याने खोटी माहिती दिली आणि फ्रेंचाईजीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घातल्याचे केसीएने स्पष्ट केले.
