आता मृत्यूला कुणीच घाबरणार नाही? डॉक्टराचा मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा दावा, पाहा फोटो

Viral News: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत एका डॉक्टराने मृताला जिवंत करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

आता मृत्यूला कुणीच घाबरणार नाही? डॉक्टराचा मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा दावा, पाहा फोटो
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 9:53 PM

डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. असंख्य डॉक्टरांनी आतापर्यंत अवघड शस्त्रक्रिया करत अनेक रुग्णांचे प्राण वाचवल्याचं आपण ऐकूण आहोत. डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफने कोरोना सारख्या महामारीत जीवावर उदार होत अनेक रुग्णांचे जीव वाचवले. डॉक्टरांमध्ये रुग्णांना अनेक आजारातून बरं करण्याची ताकद असते. आतापर्यंत असंख्य रुग्णांना डॉक्टरांनी आपल्या उपचाराने बरं केलंय. मात्र कधीकधी डॉक्टरही नियती पुढे अपयशी ठरतात. अनेक रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान दगावतात. तसेच अनेकांना नैसर्गिकरित्या मृत्यूही होतो. नियतीपुढे कुणालाच काही करता येत नाही. मात्र एक असा डॉक्टर आहे जो स्वत: डॉक्टर असल्याचा दावा करतोय. तसेच मृत व्यक्तीलाही जिवंत करण्याचा दावा या डॉक्टरने केलाय. त्यामुळे या कथित डॉक्टरची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. त्याचप्रमाणे सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टराच्या बोर्डाचा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल बोर्डाच्या फोटोत, डॉक्टराने मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेटकरीही आश्चर्चचकीत झाले आहेत. या व्हायरल फोटोतील डॉक्टराचं नाव मुन्ना तिवारी आहे. तसेच या बोर्डावर मुन्ना तिवारी या कथित डॉक्टराने मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा दावा केला आहे.

इतकंच नाही, तर सर्पदंश, हॉर्ट अटॅक, पथरी यावर 5 दिवसांत समाधानकारक उपचार करण्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच फक्त 5 दिवसातच वंध्यत्व दूर करण्याचाही दावा केला आहे. हा बोर्ड अहमदाबादमधील असल्याचं म्हटलं जात आहे. या बोर्डावर डॉक्टराचा मोबाईल नंबरही देण्यात आला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल फोटो

View this post on Instagram

A post shared by Royal.Shabd (@royal_shabd_)

“चला आता मृत्यूची भीती नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. तर एका नेटकऱ्याने हा डॉक्टर यमराजाचा नातेवाईक आहे, अशी विनोदी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर @Royal.Shabd या अकाउंटवरुन हा व्हायरल फोटो पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या फोटोला 27 लाख लाईक्स मिळाले आहेत.

Disclaimer : मृत व्यक्तीला जिवंत करणं शक्य नाही. तसं होतही नाही. मृत व्यक्ती जिवंत होते असा दावाही आम्ही करत नाहीत. आम्ही अधंश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.