AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Mahindra Twitter Post: ‘हा’ गोंडस व्हिडीओ आनंद महिंद्रांनी शेअर केलाय, बघतच राहाल…

या आधीही आनंद महिंद्रानी गणपतीची मूर्ती बनविणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला होता. आता हे खास विसर्जनाचं औचित्य साधून त्यांनी एक खूपच गोंडस व्हिडीओ शेअर केलाय.

Anand Mahindra Twitter Post: 'हा' गोंडस व्हिडीओ आनंद महिंद्रांनी शेअर केलाय, बघतच राहाल...
Anand Mahindra Viral Tweet Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 11, 2022 | 6:39 PM
Share

बिझनेस टायकून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अनेकांना आपला फॅन बनवलंय. त्यांनी शेअर केलेला कंटेंट लोकांना आवडतो. यावेळीही महिंद्राने एक व्हिडिओ शेअर करत श्रीगणेश भक्तांना चांगलेच खुश केले आहे. या आधीही आनंद महिंद्रानी गणपतीची मूर्ती बनविणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ (Video) शेअर केला होता. आता हे खास विसर्जनाचं औचित्य साधून त्यांनी एक खूपच गोंडस व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच दाद दिलीये. आनंद महिंद्रा नेहमीच इम्प्रेसिव्ह ट्विट्स (Tweets) करत असतात.

या व्हिडीओमध्ये हत्तीचं एक लहान मूल दिसत आहे. हे छोटंसं हत्तीचं बाळ आपली गोंडस सोंड हलवत सगळ्यांना बाय बाय करतंय. जणू काही बाप्पा जाताना निरोप घेतायत असं आनंद महिंद्रांचं म्हणणं आहे.

व्हिडीओ शेअर करताच लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीये. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहा…

या व्हिडिओसोबत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या! पुढच्या वर्षी भेटूया.” या कॅप्शनने अनेकांची मनं जिंकली. अवघ्या ५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

या व्हिडिओला हजारो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाईकही केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोक आश्चर्यचकित झाले, काहींनी व्हिडिओचे कौतुकही केले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.