Video: हातात, दोन्ही पायात, अहो एवढंच काय तोंडातही फळं, हावरट चिंपाझीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

या व्हिडीओमध्ये विशेष म्हणजे यात तो दोन्ही हातामध्ये, पायाच्या दोन्ही बोटात, हेच काय तोंडातही भरभरून फळं घेऊन जात आहे.

Video: हातात, दोन्ही पायात, अहो एवढंच काय तोंडातही फळं, हावरट चिंपाझीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
हातात, पायात आणि तोंडात फळ भरुन नेणारा चिंपांझी
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 5:53 PM

सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. या व्हिडीओजमध्ये काही व्हिडीओ आश्‍चर्यकारक असतात, तर काही वेळा हे व्हिडीओ असे असतात की ते पाहून आपला दिवस आनंदी बनतो. कारण कधी कधी प्राण्यांकडून माणसांना जीवनाचे असा धडा मिळतो की, ते ज्ञान जगातल्या कोणत्याही पुस्तकात सापडत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लोभी चिंपांझी दिसतो आहे. (Animal Video of Greedy Chimpanzee went viral on social media giving special massege against plastic Animal Funny Video)

चिंपांझी हा त्याच्या अनोख्या हावभावांमुळे आणि माणसाच्या अतिशय जवळचे जिन्स असल्याने लोकप्रिय प्राणी मानला जातो, मग तो माणसासारखा चालणारा असो, बसलेला असो वा माणसासारखा स्वार्थीपणा करणारा असो वा कंजूसपणा दाखवणारा, हे सर्व गुण त्याच्यात आहेत. सध्या असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये तो माणसांसारखाच लोभ दाखवत आहे. तो एकाच वेळी इतकी फळे सोबत घेऊन जातो, जणू काही त्याला पुन्हा फळे घेऊन जाण्याची संधीच मिळणार नाही…!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिंपांझी त्याच्या दोन्ही पायांवर चालताना दिसत आहे. असं चालणे ही त्याच्यासाठी काही खास गोष्ट नसली तरी या व्हिडीओमध्ये विशेष म्हणजे यात तो दोन्ही हातामध्ये, पायाच्या दोन्ही बोटात, हेच काय तोंडातही भरभरून फळं घेऊन जात आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. ज्याला हे वृत्त लिहिपर्यंत 17 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘जेव्हा तुम्हाला एका बॅगसाठी 10 रुपयेही द्यायचे नसतात.’

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या पृथ्वीसाठी चांगल्या नाहीत, हे चिंपांझींनाही माहीत आहे.’ दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘हे खूप हुशार आहे. जेव्हा मी माझ्या पुढच्या किराणा खरेदीला जाईन, तेव्हा मी हे नक्की करेन.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ आम्हा माणसांसाठी एक खास संदेश देत आहे.’ याशिवाय इतर अनेक वापरकर्त्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: या चिमुरड्या मुलींच्या मुव्हज पाहून नोरा फतेहीही घायाळ, नेटकरी म्हणाले याल म्हणतात टॅलेंट

Video: ‘डुब जा मेरे प्यार में’ गाण्यावर बेली डान्स, इन्स्टाग्रामवर आग लावणारा भन्नाट व्हिडीओ