AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला, त्याला फास बसला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने नेटकरी अवाक!

एक पाळीव कुत्रा लिफ्टमध्ये फसून मरता मरता वाचला. लिफ्टच्या दारात पाळीव कुत्र्याचा पट्टा अडकला आणि लिफ्ट सुरु झाली.

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला, त्याला फास बसला, आणि त्यानंतर जे घडलं त्याने नेटकरी अवाक!
कुत्रा लिफ्टमध्ये अडकला
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 12:35 PM
Share

इमारतीची लिफ्ट माणसाचं काम जितकं सोपं करते, तितकीच ती धोकादायकही आहे. अनेकदा घडलेल्या अपघातांवरुन हे स्पष्ट होतं. आता चीनमधील असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक पाळीव कुत्रा लिफ्टमध्ये फसून मरता मरता वाचला. लिफ्टच्या दारात पाळीव कुत्र्याचा पट्टा अडकला आणि लिफ्ट सुरु झाली. सुदैवाने त्याच वेळी एक डिलिव्हरी बॉय तिथं पोहोचला आणि त्याने कुत्र्याचा जीव वाचवला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे पाहिल्यानंतर सर्वजण या डिलिव्हरी बॉयचे खूप कौतुक करत आहेत. यूट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 21 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.(Animal Viral Video China delivery boy saves a dog whose leash got stuck in elevator in Hubei province animal rescue video in china)

चीनच्या हुबेई प्रांतात 23 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. याचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, जे स्थानिक वेबसाइट साउथ चायना मॉर्निंग पोस्टने त्यांच्या यूट्यूब अकाउंटवर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लिफ्टचा दरवाजा उघडतो, तेव्हाच एक पाळीव कुत्रा त्यात प्रवेश करतो. त्यानंतर लिफ्ट थांबते. कुत्र्याच्या मानेभोवती एक पट्टा आहे, जो लिफ्ट चालू असताना वरच्या दिशेने खेचू लागतो. हे खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे दृश्य आहे. पट्ट्याची दोरी ओढली गेल्यानंतर कुत्र्याला फास बसतो आणि तो ओरडू लागतो. त्यानंतर खालच्या मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि तिथं असलेल्या एका डिलिव्हरी बॉयला हे दिसतं, तो तातडीने या कुत्र्याची सुटका करतो.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण डिलिव्हरी बॉयच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत आहेत. लिफ्टचा दरवाजा उघडताच डिलिव्हरी बॉयने कुत्रा दोरीला लटकलेला पाहिला आणि तो घाबरला. मग कुत्र्याला त्रास झाल्याचे लक्षात येताच तो त्याला ताबडतोब आपल्या हातात घेऊन त्याचा पट्टा काढतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, डिलिव्हरी बॉयने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, ते कौतुकास्पद आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा कुत्रा खूप भाग्यवान होता, ज्याला या डिलिव्हरी बॉयने शेवटच्या क्षणी वाचवले. या व्यक्तीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.” याआधी 2019 मध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. जिथं लिफ्टमध्ये कुत्र्याचा पट्टा अडकला होता. त्यानंतर जॉनी मॅथिस नावाच्या 27 वर्षीय मुलाने त्याचा जीव वाचवला.

हेही पाहा:

Video: 12 व्या मजल्यावर लिफ्ट अडकली, लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी चिमुरड्याचा तासभर संघर्ष, यूपीतील घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

Video: आईला लांबसडक केस, मी टकला कसा?, चिमुरड्याची गोंडस रिएक्शन पाहुन तुमचा दिवस आनंदात जाईल!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.