Video: 12 व्या मजल्यावर लिफ्ट अडकली, लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी चिमुरड्याचा तासभर संघर्ष, यूपीतील घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

एक 10 वर्षाच्या मुलगा लिफ्टमध्ये तब्बल तासभर अडकून पडला (Child Trapped in Lift for 50 Minets). यादरम्यान तो लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिला, मात्र त्याला यश मिळाले नाही.

Video: 12 व्या मजल्यावर लिफ्ट अडकली, लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी चिमुरड्याचा तासभर संघर्ष, यूपीतील घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज
लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी चिमुरड्याच्या संघर्ष

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इथं एक 10 वर्षाच्या मुलगा लिफ्टमध्ये तब्बल तासभर अडकून पडला (Child Trapped in Lift for 50 Minets). यादरम्यान तो लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिला, मात्र त्याला यश मिळाले नाही. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (UP Ghaziabad Child Trapped in Lift for 1 hour KW Srishti Society CCTV Footage)

मित्रांना भेटायला गेला आणि लिफ्टमध्ये फसला!

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचं नाव इवान भारद्वाज आहे. तो राजनगर एक्स्टेंशन के डब्ल्यू सृष्टी सोसायटीच्या डी टॉवरमध्ये राहतो. मात्र मित्राला भेटण्यासाठी तो जी टॉवरमध्ये जात होता. या टॉवरच्या लिफ्टध्ये 12 व्या मजल्यावर पोहचल्यावर अचानक लिफ्ट बंद पडली. त्यानंतर इवान घाबरला. त्यानंतर त्याने लिफ्टमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरु केले. तब्बल 50 मिनिटे इवान लिफ्टमध्येच होता. यावेळी त्याला गुदमरायला झाला, त्याने त्यावेळी आपले कपडेही काढले.

पाहा व्हिडीओ:


इंटरकॉम, अलार्म बंद, सीसीटीव्हीकडे सेक्युरिटीचं दुर्लक्ष!

दरम्यान, लिफ्टबाबत किती दुर्लक्ष केलं जात होतं याचाही यात खुलासा झाला आहे. लिफ्टमध्ये फसल्यानतंर मुलाने इंटरकॉम वापरण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर अलार्मही वाजवला. पण दोन्हीही बंद होते. हेच नाही ज्या ठिकाणी सर्व लिफ्टचं सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह दिसतं, त्या व्हिडीओकडेही सोसायटी सिक्युरिटीने पाहिलं नाही. म्हणजे यात अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट दिसतं. दरम्यान, लिफ्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात या मुलाच्या हाताला दुखापत झाल्याचंही त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.

दुर्घटनेनंतर मुलगा मोठ्या धक्क्यात!

दरम्यान, खूपवेळ गेल्यानंतर इमारतीतील काही लोकांना याची माहिती मिळाली. शर्थीच्या प्रयत्नानंतर या मुलाची लिफ्टमधून सुटका करण्यात आली. सध्या मुलगा खूप घाबरला असून त्याने लिफ्टचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. दरम्यान या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. नंदग्राम पोलिस ठाण्याचे प्रभारी अमित कुमार यांनी याबाबत चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे.

 

हेही पाहा:

Video: मॅनहोलवर फटाके फोडताना गटारच पेटलं, आगीच्या भडक्यात पोरं भाजली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

Fact Check : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलल्यास आगीचा भडका उडतो?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओंमागील सत्य!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI