Anunay Sood : फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाव, लाखो फॉलोअर्स, 32 व्या वर्षी मृत्यू.. कोण होता अनुनय सूद?

Popular Travel Influencer And Photographer Anunay Sood : अनुनय सूदच्या निधनाते वृत्त समोर येताच चाहते हैराण झाले आहेत. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेल्या अनुनयचे लाखो फॉलोअर्स होते. त्याने अवघ्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूचं कारण...

Anunay Sood : फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाव, लाखो फॉलोअर्स, 32 व्या वर्षी मृत्यू.. कोण होता अनुनय सूद?
अनुनय सूद
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 06, 2025 | 12:10 PM

अख्ख जगं फिरून पालथं घालणारा लोकप्रिय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अनुनयसूद याचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी सकाळी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबियांतर्फे एक हृदयद्रावक पोस्ट शेअर करण्यात आली ज्यामध्ये अनुनयच्या निधनाबद्दल नमूद करण्यात आले होते. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सोशल मीडियावरील त्याच्या अखेरच्या पोस्टनुसार, अनुनय हा लास व्हेगासमध्ये होता.

इन्स्टाग्रामवर अनुनयचे 14 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तर यूट्यूबवर त्याचे 3.8 लाख सबस्क्रायबर्स होते. अनुनयच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्याच्या चाहत्यांना अतिशय मोठा धक्का बसला आहे. #RIPAnunaySood हे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

कुटुंबियांनी शेअर केली पोस्ट

गुरूवारी सकाळी अनुनयच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबियांतर्फे एक पोस्ट शेअर करून अननुयच्या मृत्यूची बातमी जाहीर करण्यात आली. ” अनुनय सूद हा आत या जगात नाही, अतिशय दु:खाने आम्ही हे शेअर करत आहोत. या कठीण काळात गोपनीयता आणि समजूतदारपणा अपेक्षित आहे. खाजगी मालमत्तेजवळ येणं टाळावं. त्याच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या लोकांसाठी प्रार्थना करा. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी. ” अशी पोस्ट त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळीद्वारे शेअर करण्यात आली.

 

फोर्ब्सच्या यादीत नाव

अनुनय सूद हा दुबईतील एक लोकप्रिय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि फोटोग्राफर होता. प्रवासाचे शानदार फोटो, रील्स आणि व्लॉगसाठी तो ओळखला जायचा. त्यांच्या प्रतिभेला फोर्ब्स इंडियानेही मान्यता दिली होती. 2022, 2023 आणि 2024 अशी सलग तीन वर्ष त्याचं नावं फोर्ब्स इंडिया च्या टॉप 100 डिजिटल स्टार्समध्ये समाविष्ट होतं.

फोर्ब्स बायोनुसार, प्रवासाचे डॉक्युमेंटेशन करून अनुनय सूद याने त्याच्या कामाची सुरूवात केली होती, ज्याचे नंतर यशस्वी कारकिर्दीत रूपांतर झाले. तो एक मार्केटिंग फर्म देखील चालवायचय. अवघ्या 2 दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला होता, तसेच यूट्यूबवरही शेवटचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनुनयच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. हजारो चाहते आणि सह-निर्मात्यांनी त्यांच्या पोस्टवर त्याला श्रद्धांजली वाहिली .

अनुनयची शेवटची पोस्ट