
तुम्ही भविष्याविषयी चिंतित आहात काय? तुम्हाला काही तरी विचित्र घटना घडण्याचा भास होत आहे का? खगोलच नाही तर ज्योतिष विज्ञानानुसार सुद्धा सध्या काही मोठे योग जुळून येत आहे. भूराजकीय घडामोडी भीतीदायक आहे. युक्रेन युद्ध भडकण्याची तर दुसरीकडे हमास-इस्त्रायल युद्धाचे गडद होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यातच 7 जूनपासून ग्रह-तारें काही वेगळेच संकेत देत आहेत. अनेक योग जुळून येत आहे. काय आहे ते बाबा वेंगाचे ते भाकीत, ज्यामुळे सर्वच जण भयभीत झाले आहेत.
7 जून रोजी मंगळ बदलणार राशी
7 जून 2025 नंतर अनेकांच्या मनाला काही तरी विचित्र होण्याची शक्यता सतावत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी मंगळ ग्रह त्याची राशी बदलणार आहे. ज्योतिष शास्त्रात मंगळाला युद्ध, आक्रमकता, दुर्घटना आणि विचित्र घटनांचा ग्रह मानण्यात आले आहे. आता मंगळ त्याची स्थिती बदलत असल्याने अनेक जण हे परिवर्तन अशुभ संकेत मानत आहेत. बाबा वेंगाच्या भाकिताआधारे काही जण दावा करत आहेत की जगातील अनेक देशात या काळात युद्ध भडकण्याची शक्यता आहे.
7 जून 2025 ही तारीख का इतकी महत्त्वाची?
7 जून 2025 ही ज्योतिषाचार्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तारीख मानण्यात येत आहे. या तारखेविषयी इतके गूढ वातावरण का तयार झाले आहे? काय घडामोडी घडणार आहेत? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. अनेकांच्या जीवनात यामुळे मोठे बदल घडतील. तर जागतिक पटलावर पण बदल दिसतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा ऊर्जा, धैर्य, क्रोध आणि युद्धकारक मानल्या जातो. तर सिंह राशी नेतृत्व, शक्ती आणि अहंकाराचे प्रतिक मानण्यात येते. मंगळ ग्रह हा सिंह राशीत गोचर होत आहे. प्रवेश करत आहे. त्याचा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याचे संकेत मिळत आहेत. मंगळ हा जगात मोठ्या घडामोडी घडण्यासाठी कारक ठरू शकतो. दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेत सुद्धा बडे बदल दिसू शकतात.
डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. बाबा वेंगाची भाकीत ही अचूक घटनेसह वा तारखेसह नाहीत. टीव्ही 9 मराठी याला दुजोरा देत नाही.