Baba Vanga Prediction : स्मार्टफोनवर तासनतास वेळ घालवण्याची सवय? तर बाबा वेंगाचे हे भाकीत उडवेल झोप

Baba Vanga Predictions On Screentime : बाबा वेंगाने स्मार्टफोनच्या शोधापूर्वी अनेक वर्ष अगोदरच त्याविषयीची भविष्यवाणी केली होती. 2022 नंतर अनेक लोक एका छोट्या यंत्रावर पडीक राहतील असे भाकीत तिने केले होते. तर त्याच्या दुष्परिणामांविषयी सुद्धा मोठे भाकीत केले होते.

Baba Vanga Prediction : स्मार्टफोनवर तासनतास वेळ घालवण्याची सवय? तर बाबा वेंगाचे हे भाकीत उडवेल झोप
बाबा वेंगा भाकीत
Image Credit source: गुगल
| Updated on: May 09, 2025 | 5:17 PM

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाच्या अनेक भविष्यावाण्या खऱ्या ठरल्या आहेत. दुसरे महायु्द्धाची भविष्यवाणी, 2004 मधील त्सुनामी, अमेरिकेवरील 9/11 हल्ला यासारख्या अनेक भाकीतं तिने केली होती. तिने आजच्या तंत्रज्ञान युगाविषयी पण माहिती दिली आहे. तिने तिच्या मृत्यूपूर्वी स्मार्टफोनचा शोध आणि त्याचा अतिरेकी वापर याविषयी भाष्य केले होते. 2022 नंतर अनेक लोक एका छोट्या यंत्रावर पडीक राहतील असे भाकीत तिने केले होते. तर त्याच्या दुष्परिणामांविषयी सुद्धा मोठे भाकीत केले होते.

काय आहे ती भविष्यवाणी?

बाबा वेंगाने स्मार्टफोनच्या शोधाविषयी अनेक वर्षापूर्वीच भाकीत केले होते. तिने भाकीत केले होते की, वर्ष 2022 मध्ये जगातील लोक त्यांच्या त्या छोट्या यंत्रावर, ज्यातून प्रकाश दिसतो, त्यावर चित्र आणि धावते चित्र दिसतात, त्यावर अधिक वेळ घालवतील. त्यांचा स्क्रीन टाईम वाढेल. सध्याचे चित्र पाहता, या गोष्टी समोर येत आहेत. छोट्या मुलांसह मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीनवर पडीक आहे. त्यामुळे स्क्रीन टाईम वाढला आहे.

भारताच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, 24% लोक हे झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करतात. तर जवळपास 37% मुलं हे गरजेपेक्षा अधिक काळ स्क्रीन पाहतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. त्यांची चिडचिड वाढली आहे. तर फोनमुळे अनेकांना नैराश्य आले आहेत.

AI ची भविष्यवाणी ठरली खरी

अनेक वर्षांपूर्वी बाबा वेंगाने AI विषयी मोठी भविष्यवाणी केली होती. हे भाकीत सत्य ठरत आहे. सध्या जगभरात कृत्रिम प्रज्ञेची जोरदार चर्चा आहे. चीनने तर या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. सर्वच क्षेत्रात एआयमुळे मोठी क्रांती होत आहे. आरोग्य क्षेत्रात तर मोठा बदल झाला आहे. परदेशात एआयच्या मदतीने रोगाचे निदान झटपट होत आहे. डॉक्टरांपेक्षा एआय तंत्रज्ञानामुळे रोगांचे झटपट निदान होत आहे. त्यावरील गुणकारी औषधांची यादी पण समोर येत आहे. तर इतर क्षेत्रात पण एआयने मोठी प्रगती साधली जात आहे. शिक्षण क्षेत्रापासून व्यापारी क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात एआयची मोठी मदत होत आहे.

डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.