Baba Vanga Prediction : 2025 मध्ये अजून काय काय घडणार? बाबा वेंगाच्या त्या भाकि‍ताने काळजाचा थरकाप

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची वर्ष 2025 साठीची ती भविष्यवाणी एकदम चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने जे भाकीत केले आहे, त्यामुळे अनेकांच्या काळजाचा थरकाप उडणार आहे. जगात आता भारत आणि पाकिस्तानातील तणावामुळे महाशक्ती सुद्धा चिंतेत सापडली आहे.

Baba Vanga Prediction : 2025 मध्ये अजून काय काय घडणार? बाबा वेंगाच्या त्या भाकि‍ताने काळजाचा थरकाप
बाबा वेंगाचे ती भविष्यवाणी
Image Credit source: गुगल
| Updated on: May 10, 2025 | 5:24 PM

बाबा वेंगाच्या वर्ष 2025 साठीची त्या भविष्यवाणीची आता जगात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रशिया-युक्रेन तणाव असतानाच आता भारत पाक तणावाची त्यात भर पडली. त्यात वेंगाच्या आणखी एका भाकि‍ताने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. हे वर्ष संकटांचं तर नाही ना असा सवाल काहींना पडला आहे. बाबा वेंगाच्या गूढ काव्यात कोणत्याही देशाचे नाव न घेता या वर्षात भीषण युद्ध होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे तो दावा?

न्यूयॉर्क पोस्टनुसार, वेंगाने एका मोठ्या संघर्षाबाबत जगाला हा इशारा दिला आहे. या भाकितानुसार, नवीन घडामोड युरोपला मोठा हादरा देणारी असेल. त्यांनी कोणत्या ही देशाचे नाव दिले नाही. पण सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यांनी ही भविष्यवाणी अने वर्षांपूर्वी केली होती. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. कारण जगभरात अस्थिरता वाढत आहे.

वेंगाने 2025 मध्ये मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी केली होती. 28 मार्च रोजी म्यानमार मध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 1,700 हून अधिक लोकांचा जीव गेला. तर भूकंपामुळे थायलंडचे नुकसान झाले. या देशात 100 हून अधिक लोक इमारती खाली दबले होते.

बाबा वेंगाच्या ही भाकीतं खरी ठरल्याचा दावा

बल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिचे 1996 मध्ये निधन झाले. तिच्या भविष्यवाणीमुळे ती लोकप्रिय ठरली. तिने केलेल्या अनेक भविष्यवाण्या जगात खऱ्या ठरल्या. बाबा वेंगा ही अर्धशिक्षित होती आणि त्यांनी स्वत: त्यांच्या दृष्टांतांची नोंद केली नाही. तर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या भविष्यवाण्या लिहून ठेवल्या. वेंगा या त्यांची भाकीत स्पष्टपणे सांगत नसत. तर त्या गूढ कविता म्हणत. त्यातून मग त्यांचे अनुयायी एक अर्थ लावत. पण त्यांच्या काही गूढ काव्याचे आताशी काही संदर्भ जुळल्याने त्या भाकि‍तांना महत्त्व आले.

द्वितीय विश्वयुद्धाचे भाकीत

2004 ची महाभयंकर त्सुनामी

सोव्हिएत संघाचे विघटन

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकावर झालेला दहशतवादी हल्ला

डिस्क्लेमर : या दाव्यांबद्दल पुरेशी आणि ठोस पुरावे किंवा अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.