मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन, बघताच प्रेमात पडतात लोक

तुम्हाला देखील विकेंडला चांगल्या ठिकाणी भेट देयची असेल तर मुंबई पासून काही तासांच्या अंतरावर आहे स्वर्गापेक्षाही खूपच सुंदर ठिकाण. एकदा भेट द्याल तर परत जावू वाटणार नाही.

| Updated on: Feb 21, 2026 | 12:51 PM
1 / 6
मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर स्वर्गापेक्षाही सुंदर असे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते.

मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर स्वर्गापेक्षाही सुंदर असे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते.

2 / 6

आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जे नाशिकपासून खूपच कमी अंतरावर आहे. जिथे गेल्यावर परत येण्याची इच्छा होत नाही.

3 / 6

हे ठिकाण नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव आहे इगतपुरी. हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही.

4 / 6

डोंगररांगा, दाट अरण्य, धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे इगतपुरीला खास ओळख मिळाली आहे. त्यामुळेच विकेंड ट्रिप किंवा सुट्टीसाठी हे ठिकाण अनेकांच्या पसंतीस उतरते.

5 / 6

नाशिकपासून साधारण 45 किमी अंतरावर असलेले इगतपुरी हे मुंबई-नाशिक महामार्गालगत वसलेले आहे. पावसाळ्यात तर येथे हिरवाईची उधळण पाहायला मिळते. डोंगरांवर पसरलेले ढग, वाहणारे धबधबे आणि शांत वातावरण यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर शांतता अनुभवता येते.

6 / 6

इगतपुरी परिसर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक किल्ले आणि डोंगरमाथे आहेत, जे साहसी प्रवाशांना आकर्षित करतात. हरिहर किल्ला, त्रिंगलवाडी किल्ला आणि कळसूबाई शिखराच्या परिसरात ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us