AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह! वास येऊ नये म्हणून लढवली अनोखी शक्कल… बायको घरमालकासोबत फरार

पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृताची ओळख सूरज अशी झाली असून तो विट भट्टीवर काम करत होता. या घटनेनंतर त्याची पत्नी, मुले आणि घरमालक फरार झाले आहेत. पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त करत तपास सुरू केला आहे.

पुन्हा निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह! वास येऊ नये म्हणून लढवली अनोखी शक्कल... बायको घरमालकासोबत फरार
Blue DrumImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 18, 2025 | 1:38 PM
Share

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील निळ्या ड्रमच्या कांडानंतर आता राजस्थानमधून असाच एक खुनाचा प्रकार समोर आला आहे. अलवर जिल्ह्यातील तिजारा उपखंडातील किशनगढ़बास कसब्यात रविवारी खळबळ उडाली. येथील एका घराच्या छतावर ठेवलेल्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममधून दुर्गंधी येऊ लागली होती. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाने ड्रम उघडला तेव्हा त्यांना त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.

मीठ टाकून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न

पोलिस तपासात समोर आले की, मृतदेह लवकर सडू नये म्हणून ड्रममध्ये मीठ टाकण्यात आले होते. असा संशय आहे की, खुनानंतर आरोपींनी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी मिठाचा वापर केला गेला. मृताची ओळख सूरज नावाच्या तरुणाची आहे, जो उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. तो सुमारे दीड महिन्यांपूर्वी किशनगढ़बास येथील आदर्श कॉलनीत भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होता.

वाचा: तेलगीने डान्सबारमध्ये तमन्ना भाटियावर उडवले करोडो रुपये? सर्वात श्रीमंत बार गर्लशी काय आहे कनेक्शन?

खुनामागचे रहस्य काय?

स्थानिकांनी सांगितले की, सूरज जवळच्याच एका विट भट्टीवर काम करत होता. तो आपली पत्नी आणि तीन मुलांसह या घरात राहत होता. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर त्याची पत्नी आणि मुले गायब झाले आहेत. एवढेच नव्हे, तर ज्या घरात सूरजचे कुटुंब राहत होते, त्या घराचा मालकही घटनास्थळावरून फरार झाला आहे. यामुळे हे प्रकरण आणखी रहस्यमय बनले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृतकाच्या कुटुंबासह घरमालकाचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक तपासात खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिस सर्व पैलूंवर तपास करत असून कॉल डिटेल्स, परस्पर संबंध आणि शेजाऱ्यांकडून चौकशी करत प्रकरणाच्या कड्या जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मेरठमध्येही घडले होते असेच कांड

यापूर्वी काही महिन्यांपूर्वी मेरठमध्येही असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह तीन तुकड्यांमध्ये कापून ड्रममध्ये टाकला होता. आता किशनगढ़बास येथील हे प्रकरणही असाच गुन्हा घडल्याकडे निर्देश करत आहे. सध्या पोलिस पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे आणि संपूर्ण परिसरात सखोल चौकशी करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पत्नी आणि घरमालक यांच्या गायब होण्यामुळे खुनाच्या गूढाचा उलगडा करण्यासाठी महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?