आधी मीटींग कर नंतर जा… काकाच्या निधनावर बॉसने सुट्टी नाकारली, कर्मचाऱ्याने बॉसला शिकवला अनोखा धडा

एकीकडे आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला कॉर्पोरेटमध्ये दिला जात आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कशाप्रकारची वागणूक दिली जात असल्याचे एक उदाहरण रेडीटवर शेअर झाले आहे. परंतू या कर्मचाऱ्याने बॉसला दिलेले उत्तर त्याला माणूसकी शिकवणारे आहे.

आधी मीटींग कर नंतर जा... काकाच्या निधनावर बॉसने सुट्टी नाकारली, कर्मचाऱ्याने बॉसला शिकवला अनोखा धडा
employee
| Updated on: Nov 18, 2025 | 7:08 PM

अलिकडे सोशल मीडियावर एक WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्याने भारतातील ‘टॉक्सिक वर्क कल्चर’ बद्दल एक चर्चा सुरु झाली आहे. हा चॅट केवळ दोन व्यक्तींमधील चर्चा नसून लाखो कर्मचाऱ्यांचा आतला आवाज आहे. जो दरदिवशी कामाचा अतिरिक्त दबाव झेलणाऱ्या आणि माणूसकी विसरलेल्या मॅनेजर वा बॉसशी लढत आहेत.

ही कहाणी एका Gen Z कर्मचारी आणि त्याच्या मॅनेजरची आहे. ज्याला X वर @WhateverVishal नावाच्या हँडलने पोस्ट केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की भारताच्या टॉक्सिक वर्क कल्चर केवळ GenZ बदलू शकते. या पोस्टला १४ लाख व्ह्युज आणि १९ हजार लाईक्ससह शेकडो कमेंट्स मिळाले आहेत.

व्हायरल व्हॉट्सअप चॅटमध्ये पाहू शकता की कर्मचाऱ्याने मॅनेजरला मॅसेज करुन सांगितले की त्याच्या पित्या समान काकांचा मृत्यू झाला आहे. अशात त्याला कुटुंबासोबत उपस्थित रहाण्यासाठी सुट्टी हवी आहे. दु:खाच्या या क्षणाला माणूसकी दाखवणे गरजेचे होते.परंतू उत्तर काय मिळाले ?

मॅनेजरने सांगितले की आधी क्लायंट मीटींक कर, आणि नंतर जा. मॅनेजरने सहानुभूती दाखवण्याऐवजी लगेच क्लायंटची मीटींग आणि कामाला प्राथमिकता दिली. जेव्हा कर्मचाऱ्याने सांगितले की तो या मानसिक स्थितीत मीटींगमध्ये सामील होऊ शकत नाही. त्यानंतर मॅनेजरने त्याच्यावर दबाव टाकला.

जेव्हा मॅनेजरने थेट धमकी दिली की सुट्टीला LWP ( Leave Without Pay ) बिन पगारी रजा म्हणून मार्क केले जाईल. तसेच सोमवारी डेथ सर्टीफिकेट घेऊन येण्यास सांगितले. जणू दु:खाच्या घडीत कागदपत्रं जमा करणे सर्वात गरजेचे काम आहे. हा वागणूक दर्शवते की कसे कंपन्या कर्मचाऱ्यांना केवळ एक रिसोर्स ( संसाधन ) समजते, ज्यांना भावना आणि खाजगी जीवन नसते.

कर्मचाऱ्याच्या उत्तराने सर्वांचे हृदय जिंकले

परंतू या कहाणीचा खरा हिरो तर तो कर्मचारी निघाला. त्याने झुकण्यास नकार दिला. त्याने आपल्या मॅनेजरला स्पष्ट शब्दात उत्तर दिले. त्याचे उत्तर माणूसकीने भरलेले होते. जर तुम्ही एवढी गोष्ट समजू शकत नसाल तर कदाचित मी चुकीच्या जागी काम करत आहे. या उत्तरात केवळ राग नव्हता, तर एक आत्मसन्मान होता. त्याने स्पष्ट केले की त्याची प्राथमिकता काय आहे. मृत्यूच्या समोर एक क्लायंट मीटींग या कॉर्पोरेट डेडलाईनची कोणती किंमत नसते. हे सांगणे आजच्या वातावरणात हिंमतीचे काम आहे. परंतू ही तिच बदललेली मानसिकता आहे, ज्याची आज सर्वात जास्त गरज आहे.

मॅनेजरने शेवटी रागाने त्याला HR शी बोलायला सांगितले आणि धमकी दिली कदाचित तो पुढे काम करु शकणार नाही. परंतू सोशल मीडियावर लोकांनी या कर्मचाऱ्याला सलाम केला आणि सांगितले की, ‘केवळ Gen Z च भारताच्या टॉक्सिक वर्क कल्चर बदलू शकते.

येथे पाहा पोस्ट –

ही घटना एक वेक -अप कॉल आहे. केवळ मॅनेजरांसाठी नव्हे तर त्या सर्व कंपन्यांसाठी जे कामाच्या नावावर कर्मचाऱ्यांचे शोषण करतात. कस्टमर गरजेचा आहे. परंतू माणूसकीपेक्षा जास्त गरजेचा होऊ शकत नाही. आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की चांगल्या कामाचे वातावरण ते असत जेथे विश्वास असतो. जेथे कर्मचाऱ्याला विश्वास असतो की अडचणीच्या काळात कंपनी त्याच्या सोबत उभी राहिल. जर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याच्या दु:खाचा आदर करु शकत नसाल तर त्याच्याकडून लॉयल्टीची आशाही कधी करु नका. तुम्ही काय विचार करता ? तुम्ही या प्रकारच्या Toxic Work Culture चा सामना केला आहे का ?