AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : हार घालताना मित्र म्हणाला “हॅप्पी बर्थडे!”, नवरीबाईंचा रागराग, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

हा व्हीडिओ deepakbaghel1010 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 35 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केलंय.

Video : हार घालताना मित्र म्हणाला हॅप्पी बर्थडे!, नवरीबाईंचा रागराग, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
व्हायरल व्हीडिओ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 14, 2022 | 8:30 AM
Share

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे अनेक मजेशीर व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. काही व्हीडिओ पाहून तर पोट धरून हसावं लागतं, इतके ते फनी असतात. आताही एका लग्नातील असाच फनी व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला (Viral Video) मिळत आहे. या व्हीडिओमध्ये वधू-वर एकमेकांना हार घालताना नवरीचं वर्तन पाहून अनेकांना हसू आलंय. अनेकांनी त्याला लाईक आणि कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.या व्हीडीओमध्ये लग्नातल्या हार घालण्याच्या विधीवेळी गंमत घडते.वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. यावेळी वधूच्या मैत्रिणी तिची चेष्टा करायला लागतात. तेव्हा ही नवरीबाई चिडते.तिचा हा सगळा राग तिच्या हार घालण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसतो. ती रागात नवरदेवाच्या गळ्यात हार घालते. मग नवरदेवही तिच्या गळ्यात हार घालतो. पण तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं ती रागातच तिच्या या मैत्रिणींकडे पाहाते. यावेळी व्हीडिओ काढणारी व्यक्ती हॅपी बर्थ डे टू यू, असं म्हणते. विशेष म्हणजे नवरीच्या या चिडलेल्या व्हीडिओला तुम जब ऐसे शरमाती हो, हे गाणं बॅगराऊंडला लावलंय.  हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हीडिओत नवरी आधीच रागात दिसत आहे आणि इतक्यात एकजण हॅपी बर्थडे म्हणतो मग ही नवरीबाई अधिकच चिडते. वधूला हा विनोद अजिबात आवडलेला दिसत नाही आणि ती स्टेजवरूनच आपला राग दाखवताना दिसतेय. दुसरीकडे, वर मात्र शांत दिसत आहे. तो यावर काहीही बोलत नाही. पण वधू मात्र या मित्रांकडे एकटक रागाने पाहात आहे. हा व्हीडिओ deepakbaghel1010 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 35 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केलंय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?