
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नाच्या दिवशीच बायकोने नवऱ्याला एक भन्नाट सरप्राइज दिले आहे. हे सरप्राइज पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 कोटी लोकांनी पाहिला आहे. आता बायकोने नेमकं काय केलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवी नवरी 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या अल्बममधील एका गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. यावेळी नवऱ्याचा प्रतिसादही पाहण्यासारखा आहे. नवरीने तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. सामान्यतः मुली त्यांच्या खास दिवशी ट्रेंडिंग गाण्यांवर नाचतात, परंतु या आधुनिक वधूने 90 च्या दशकातील एक सुपरहिट गाणे निवडून सर्वांना आश्चर्यचकित केले. बायकोच्या अदांनी नवऱ्याचा प्रतिसाद या व्हिडीओला आणखी खास बनवत आहे.
वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बायको 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या अल्बममधील एका गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. नवरीची नाजूकता, चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि कमालचे हावभाव यांनी केवळ वातावरणात रंगत आणली नाही, तर तिथे उपस्थित प्रत्येकाला मंत्रमुग्ध केले.
नवऱ्याचा प्रतिसाद पाहण्यासारखा
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा वधू स्टेजवर परफॉर्म करत होती, तेव्हा वर डोळे न मिचकावता तिच्याकडेच पाहत राहिला. वराच्या प्रतिसादात आपल्या वधूसाठी प्रेम आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता, ज्यामुळे नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
7 कोटी लोकांनी पाहिला हा व्हिडीओ
हा डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर @toor.manpreet या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत जवळपास 7 कोटी वेळा पाहिला गेला आहे आणि 44 लाखांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “नवऱ्यासाठी नाचण्याचा आनंद कशाशीच तुलना होऊ शकत नाही.” या व्हिडीओवर एक युजरने विनोदीपणे कमेंट करत म्हटले की, “भाऊ, तुझ्या कर्मांची यादी जरा दे.” दुसऱ्या युजरने म्हटले, “मी तर हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “खूपच गोड.”