लग्नातून पळ काढताना नववधूने काढला व्हिडीओ! VIRAL
एका युझरचं म्हणणं आहे की, "तुम्हाला खूप उशीर झाला आहे", तर दुसरा म्हणतो की, "नववधूचं धाडस पाहा."

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आपलं मनोरंजन करत असतात. स्कूटी चालवताना लग्नापासून लांब पळून जाण्याचा सल्ला देणाऱ्या नववधूचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप ट्रेंड होतोय. या व्हिडिओने सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकलीयेत. या छोट्या व्हिडिओमध्ये एक नवरी स्कूटी चालवताना दिसतीये. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ॲक्शन रिप्ले सिनेमातील ‘जोर का झटका हाय जोरो से लगा’ हे प्रसिद्ध गाणं सुरू आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरी या गाण्यावर हावभाव देत गाडी चालवतीये. हा ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हीही एकदा पाहाच…
लग्नापासून लांब पळून जाण्याची हीच संधी आहे असं ही नवरी या व्हिडीओमध्ये म्हणतीये. या नववधूचे हावभाव एखाद्या चित्रपटाच्या नायिकेपेक्षा कमी नाहीत.
या कॉमेडी व्हिडिओवर अनेक युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अशात हा व्हिडिओ अनेक लाईक्स आणि व्ह्यूज शेअर करत आहे.
आपल्या स्पष्टवक्तेपणानं आणि अभिनयानं अनेक जण या स्कुटी चालवणाऱ्या नववधूचे चाहते झाले आहेत. एका युझरचं म्हणणं आहे की, “तुम्हाला खूप उशीर झाला आहे”, तर दुसरा म्हणतो की, “नववधूचं धाडस पाहा.”
View this post on Instagram
भर रस्त्यात ही नववधू मेकअप करून, घागरा घालून मोठ्या आत्मविश्वासाने डान्स करत रस्त्याने जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोकही तिच्या प्रेमात पडलेत.
