AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जूते दे दो, पैसे ले लो… अरे हे काय ? नवरदेवाऐवजी चक्क भटजींचे बूट चोरले, हसून लोटपोट झाले वऱ्हाडी

लग्नसमारंभात नवरदेवाचे बूट चोरण्याची पद्धत सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. नवरीच्या बहिणी, मैत्रिणी या जुते चुराई मध्ये खूप व्यस्त असतात. त्यात अनेक गमतीजमती घडतात. पण सध्या एका लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून वऱ्हाडी देखील हसून लोटपोट झाले. तुम्हीपण बघा, नेमकं काय झालं ?

जूते दे दो, पैसे ले लो... अरे हे काय ? नवरदेवाऐवजी चक्क भटजींचे बूट चोरले, हसून लोटपोट झाले वऱ्हाडी
लग्नातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 27, 2024 | 2:33 PM
Share

लग्नसमारंभ सध्या मोठ्या धूमधडाक्यात पार पडतात. मेंदी, हळद, संगीत, लग्न, रिसेप्शन अशा थाटात छान लग्न पडतं. त्यातच वराच्या, अर्थात नवऱ्या मुलाच्या चपला चोरण्याची पद्धतही खूप लोकप्रिय झालेली आहे. वराच्या चपला पळवण्यासाठी वधूच्या बहिणी, मैत्रिणी प्रयत्न करत असतात, तर त्या चपला सेफली सांभाळून ठेवायची जबाबदारी वराच्या मित्रांची आणि भावांची असते. त्यासाठी अनेक जुगाडही केले जातात. काही जण चपला लपवतात, तर काही जण त्या चपला सतत स्वत:कडेच ठेवून फिरत असतात. चपलांच्या बदल्यात पैसे उकळण्याचा वधूच्या बहिणींचा प्लान असतो. काही वेळा हा यशस्वी ठरतो पण काहीवेळा वेगळीच मजा घडते. अशीच एक मजेशीर घटना नुकतीच एका लग्नात घडली, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तो पहाल तुम्हीदेखील हसतच रहाल.

नेमकं काय झालं ?

खरतर वधूच्या बहिणी आणि मैत्रिणी या वराचे बूट पळवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचा प्लान त्यांच्यावरच उलटला. घाईघाईत त्यांनी बूट तर पळवले, पण नंतर लक्षात आलं की ते बूट नवरदेवाचे नव्हे तर लग्न लावणाऱ्या भटजींचे होते. जेव्हा ही गोष्ट नवरदेवाला समजली तेव्हा त्यालाही हसू आवरता आलं नाही. वराकडचे कुटुंबीय आणि त्याचे मित्रही हसून हसून बेजार झाले. ते भटजी लग्न लावण्यासाठी आले होते, त्यांना दक्षिणाही चांगली मिळाली. पण त्या बदल्यात त्यांच्या चपलाच चोरी झाल्या.

काय आहे Viral Video ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर मंडपात बसलेले दिसत आहेत. पंडितजी मंत्र म्हणत असताना वधूच्या बहिणी हे तिथले बूट चोरतात. पण ते बूट वराचे नव्हतेच कारण त्याच्या मित्रांनी ते अतिशय शिताफीने लपवून ठेवले होते. वधूच्या मैत्रिणींनी बूट पळवले पण ते लग्न लावणाऱ्या भटजींचे होते. मुलीकडच्यांना समजलंच नाही की ते बूट कोणाचे आहेत. मित्रांना हे समजलं आणि त्यांनी वराल ही गोष्ट सांगितली. त्यालाही त्याचं हसू आवरलं नाही. तो पोट धरून हसू लागला. हा व्हिडिओ kssaahhiill नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहून लोकंही हसत आहेत. अप्रतिम प्लानिंग आहे भाऊ, आता काही नवरा मुलगा पैसे देत नाही , अशी कमेंट काहींनी केली. तर काहींनी त्यांचे किस्सेही शेअर केले. हा व्हायरल व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.