
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ असे असतात की आपला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेन्सलाही मागे टाकले आहे. बिहारच्या एका तरुणाने आपल्या कल्पकतेचा वापर करुन असा काही जुगाड केला आहे. पाहणाऱ्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. तुम्हाला हा व्हिडीओ नक्कीच बुचकळ्यात टाकेल.
व्हायरल व्हिडीओत एक तरुण दिसत आहे. मात्र त्याच्या शरीराचा भाग अर्धा दिसत आहे. तर कमरेखालचा भाग ( जीन्सची पॅण्ट ) तो हातात घेऊन एखाद्या झोंबी सारखा तो अधांतरी चालत येताना पाहून तुम्हाला वाटेल हा व्हिडीओ एखादा स्पेशल इफेक्ट किंवा एआयने तयार केलेला आहे. या आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून कोणीही बुचकळ्यात पडेल.
या व्हिडीओच्या पुढच्या भागात ट्वीस्ट येतो. हा युवक स्वत:चे पाय आणि वरचा भाग हातात घेऊन जात असताना अचानक पाठी वळतो. तेव्हा आपल्या आणखीन मोठा धक्का बसतो. त्याने कपड्यांच्या विचित्र डिझाईनचा वापर करुन हे अनोखे व्युज्युअल इल्युशन तयार केले आहे जे सर्वांनाच गोंधळात टाकते. त्याने त्याच्या शर्टाचा अर्धा भाग कापून त्याला अशा प्रकारे परिधान केला आहे की असे वाटते त्याचा अर्धा शरीराचा भाग गायब झाला आहे.
व्हिडीओच्या सोबत कॅप्शनमध्ये लिहीलेय की ‘भावाने तर AI लाही मागे टाकले !’ AI शॉक्ड, बिहारी रॉक्स! म्हणजे भावाने एआयला देखील मात दिली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओ युजर आपल्या प्रतिक्रीया नोंदवत आहेत, हे एआय सॉफ्टवेअर नाही असेल टॅलेंट आहे.
या व्हिडीओवर युजर्सनी जबरदस्त प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. एकाने लिहीलेय की एआय याचे टॅलेंट कसे हिसकावू शकते. अन्य एका युजरने म्हटलेय की मी आता ही गोंधळलेला आहे ! एकाने लिहिलेय की बिहारमध्ये अखेर इतके टॅलेंट येथे कोठून ? एका युजरने मजेने लिहिलेय की शर्ट आणि पॅण्ट एका रिलसाठी फाडली आहे ! एक कमेंट सर्वात मजेशीर आहे. एआयचा अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जन देखील याला रिप्लेस करु शकत नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
अखेरीस जेव्हा हा तरुण मोठ्या शिताफीने यु-टर्न घेतो, तेव्हा लोक म्हणतात हा यु-टर्न तर कमालीचा होता. हा व्हिडीओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कलात्मकता आणि कौशल्य यंत्रात नाही तर माणसाच्या मेंदूत आहे. आणि हा तरुण याचे उदाहरण आहे.