रस्त्याच्या कडेला मिळाले निळे अंडे, कपलने उत्सुकतेने घरी आणले, अंड्यातून जे बाहेर पडले…
सोशल मीडियावर अलिकडे एक अनोखा ट्रेंड चालू आहे.त्यात लोक अचानक भेटलेल्या प्राण्यांच्या पिल्लांना पाळताना दिसत आहे. या कपलला निळे अंडे सापडले,त्यानंतर काय झाले हे वाचा..

एका जोडप्याला पार्कच्या रस्त्याच्याकडेला एक अनोखे निळ्या रंगाचे अंडे सापडले. या जोडप्याने या अनोख्या अंड्याला घरी आणले आणि त्याला कृत्रिमरित्या उबवण्याचा प्रयत्न केला. त्या अंड्याची रोज काळजी घेतली गेली. अशा प्रकारे ५० दिवस गेले. त्यानंतर हे अंडे अखेर फुटले आणि त्यातून अनोखा पक्षी बाहेर आला. त्याला पाहून या जोडप्याला आधी भिती वाटली नंतर मोठे आश्चर्य वाटले.
या जोडप्याचा हा व्हिडीओ युट्युब आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लाखो लोक हैराण झाले आहेत. ऑस्ट्रलियाच्या सिडनी येथील पार्कात हे तरुण जोडपे वॉक करायला गेले होते. त्यांना एक चमकदार निळ्या रंगाचे अंडे सापडले. या अंड्याचा आकार कोंबडीच्या अंड्याच्या दहा पट मोठा होता. तसेच त्याचा रंग गडद निळा होता. त्या तरुणाच्या पत्नीने ही अंडी घरी नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी या अंड्याला उबवण्यासाठी कृत्रिम यंत्रणेचा वापर केला.
आई सारखी काळजी घेतली
पतीने बरेच रिसर्च केले तेव्हा त्यांना वाटले की हे अंडे इमूचे असू शकते. इमू हा ऑस्ट्रेलियातील विशालकाय पक्षी आहे. उत्सुकतेपोटी त्यांनी अंड्याला इनक्युबेटरमध्ये ठेवले. त्याचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस ठेवले, आणि आद्रता ४०-५० टक्के ठेवली. दर दिवशी या अंड्याची काळजी घ्यायचे आणि कँडलिंगद्वारे आता पिल्लाचा विकास किती झाला हे चेक करायचे. ५० दिवसानंतर अखेर तो दिवस आला. त्यानंतर इमूची अंडी ४६-५६ दिवसानी फूटून त्यातून पिल्ले बाहेर येतात हे त्यांना कळले होते. इमू हा पक्षी ऑस्ट्रीच सारखी दिसतो. परंतू त्याहून छोटा असतो. त्याची लांबी सहा फूट आणि वजन ५० किलोपर्यंत असू शकते. या जोडप्याला वाटले आधी हे वेगळ्या पक्षाचे अंडे असेल परंतू ते अखेर इमूचे निघाले.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
कुटुंबाचा सदस्य बनला
इमूचे पिल्ले जन्मल्यानंतर लागलीच चालायला लागता. यांचे पालन त्यांच्या आईच्या ऐवजी वडील करतात. परंतू या कपलने त्यांची जबाबदारी घेतली. त्यांनी या पिल्लाचे नाव ब्ल्यू असे ठेवले.पहिले तीन- चार दिवस हे इमूचे पिल्लू न जेवताच राहिले. कारण अंड्याचा योक त्याच्या पोटात होते. त्यानंतर दाणे आणि हिरव्या भाज्या ते खाऊ लागले.कपलने त्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या युट्युब शॉर्ट्सना १० मिलियन व्यूज मिळाले आहेत. नेटीजन्स कमालीच्या रिएक्शन दिल्या आहेत. अनेकांनी यास चमत्कार म्हटले आहे.
