Bull On Bike Viral Video: बैल बघा कसा सीट बेल्ट लावून बसलाय! एकदम थाटात

खरंतर या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बाईकवर असा काही पराक्रम केलाय की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे.

Bull On Bike Viral Video: बैल बघा कसा सीट बेल्ट लावून बसलाय! एकदम थाटात
Bull On bike
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 13, 2022 | 10:54 AM

अनेकदा आपण सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे व्हिडीओ बघतो. हे व्हिडीओ खूप अजब गजब असतात. काही खूप मजेदार असतात. काहींवर विश्वास बसणार नाही असेही व्हिडीओज असतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओला काही लोकांनी हसण्यावारी घेतलं तर काही लोक यावर संतापले. खरंतर या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बाईकवर असा काही पराक्रम केलाय की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यामागे माणूस नसून बैल (Trending Bull On Bike) बसलेला आहे. अहो हे तर काहीच नाही, बैल बसला ते बसलाय वर सीट बेल्ट लावून (Seat Belt) बसलाय त्यामुळेच लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये चालत्या बाईकवर स्वार झालेला बैल पाहून अनेकांना आपल्या प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखता येत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काही लोकांनी तर या व्यक्तीला खतरो के खिलाडी म्हटलंय.

हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी (सोशल मीडिया युजर्स) हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

हा व्हिडिओ पाहून काही लोक विनोद करतायत, तर काही लोकांनी बाईक चालकाला बैलाला असं वागवल्याबद्दल ट्रोलही केलं.