Video: विवाहाचा सर्वोत्तम प्रस्ताव, उद्योगपती हर्ष गोयंकांनाही व्हिडीओ आवडला, विवाह प्रस्तावावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

उद्योगपती गोयंका यांनी ट्विटरवर वधू शोधत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. आणि लोकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Video: विवाहाचा सर्वोत्तम प्रस्ताव, उद्योगपती हर्ष गोयंकांनाही व्हिडीओ आवडला, विवाह प्रस्तावावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
उद्योगपती गोयंका यांनी ट्विटरवर वधू शोधत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 6:07 PM

उद्योगपती हर्ष गोयंका जेव्हा त्यांच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही पोस्ट शेअर करतात, तो कन्टेंट लगेच व्हायरल होतो. उद्योगपती गोएंका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा त्याच्या ट्विट्सबद्दलही चर्चेत असताच. यावेळी उद्योगपती गोयंका यांनी ट्विटरवर वधू शोधत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. आणि लोकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ( Businessman harsh-goenka-tweet-goes-viral-shows-a-video-of-man-looking-for-bride users post funny comments )

उद्योगपती गोयंका यांची नवीन पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक माणूस अतिशय मजेदार पद्धतीने त्याचं प्रोफाइल आणि पात्रतेबद्दल सांगताना दिसत आहे. या मुलाला नवरी हवी आहे, त्याला लग्न करायचं आहे आणि त्यासाठीत तो आपल्याला कोणत्या प्रकारची वधू हवी आहे हे देखील सांगतो. तो ज्या पद्धतीने आपली माहिती आणि अपेक्षा सांगत आहे ते पाहुन अनेक लोकांचं मनोरंजन होत आहे.

व्हिडिओवर लिहण्यात आलं आहे, सर्वोत्तम विवाह प्रस्ताव. हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर करताना हर्ष गोयंकानी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘यांच्या योग्य वधूने कृपया अर्ज करा.’

विशेष गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तीचा व्हिडिओ हर्ष गोयंका यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, त्याने त्याला प्रत्युत्तरही दिले आहे. दानिश सैत नावाच्या युजरने उत्तर देताना प्रतिक्रिया दिली आहे, ‘धन्यवाद सर, माझा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल. मी विवाहित आहे आणि मी खूप आनंदी आहे. ‘यावर गोयंका यांनी एक मजेदार उत्तरही दिले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘खूप आनंद झाला. कृपया हनिमून फोटोही शेअर करा. ‘यासोबतच त्यांनी स्मायलीही टाकल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

1 मिनिट 58 सेकंदांचा हा व्हिडिओ 46 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. गोयंकांना प्रश्न विचारत, एका युजरने कमेंट केली की, सर, तुम्ही एक वेगळी टीम नेमली आहे का?, जी तुमच्यासाठी असे मजेदार ट्विट शोधण्याचे काम करते. यावर गोयंकांनी मी हे स्वत: करतो असा रिप्लाय केला आहे.

हेही पाहा:

Video: LED वर शिकवायला गेले आणि रोमॅन्टिंक गाणं सुरु झालं, पोरांचा शाळेच्या वर्गातला दंगा सोशल मीडियावर व्हायरल

Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!