
कधी कोणत्या देशात काय घडेल याचा काहीही नेम राहिलेला नाही. त्यातच आता एक अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे जी ऐकल्यानंतर तुम्हालाही जोरदार धक्का बसले. नातवंडं खेळवण्याच्या वयात शुगर डॅडी बनून फिरणाऱ्या एका ६६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या प्रेयसीला कोर्टाने मोठा दंड ठोठावला. सध्या या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये राहणारा एका ६६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे तरुणीसोबत अफेअर सुरु होते. विशेष म्हणजे, हे दोघे १९८० च्या दशकात एकाच कारखान्यात काम करत होते. त्यानंतर अनेक वर्षांनी २०२३ मध्ये झालेल्या एका पार्टीत त्यांची पुन्हा भेट झाली. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. २४ जुलै रोजी त्या दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला आणि ते भेटले. त्या दोघांनी सोबत रात्र घालवली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती महिला जेव्हा जागी झाली, तेव्हा तिला तिचा प्रियकर निपचित पडलेला दिसला.
प्रियकराची अवस्था पाहून ती प्रचंड घाबरली. यानंतर ती लगेचच हॉटेलमध्ये पळून गेली. मात्र काही वेळाने ती पुन्हा परत आली. ती परतल्यानंतर रुममध्ये गेली. मात्र रुमममध्ये आल्यानंतर तिला हॉटेलचा दरवाजा उघडता आला नाही. यानंतर तिने कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. आत जाऊन पाहिल्यावर व्यक्तीमध्ये कोणतीही हालचाल नव्हती. तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली. ही बातमी त्याच्या कुटुंबियांना कळताच, त्यांनी त्या महिलेविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली. त्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी त्या महिलेने कुटुंबियांना भरपाई म्हणून सुमारे ६७ लाख रुपये द्यावे, अशी याचिका दाखल करण्यात आली.
यानंतर कोर्टाने दोन्ही बाजूंचा सखोल विचार केला. कोर्टाने सर्वप्रथम वैद्यकीय तपासणीच्या निष्कर्षांचा आधार घेतला. त्यानुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू अचानक घडलेला प्रकार नसून, तो जुन्या आजारांमुळे झाला होता, हे स्पष्ट झाले. याचा अर्थ, त्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी ती महिला थेटपणे जबाबदार नव्हती. पण कोर्टाने यात एक आणखी धक्कादायक खुलासा केला आहे. त्या महिलेच्या अनैतिक वर्तनामुळे त्याचा मृत्यू झाला, असे यात नमूद करण्यात आले. त्यावेळी जर तिने तात्काळ मदतीसाठी पाऊल उचलले असते. तर ती व्यक्ती जिवंत असती, असे कोर्टाने नमूद केले.
पण जेव्हा त्या व्यक्तीची तब्येत बिघडली, तेव्हा ती घाबरली आणि तिथून निघून गेली. सुमारे एक तासानंतर ती पुन्हा परत आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या कारणामुळे, कोर्टाने त्या महिलेला ८,६०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ७.५ लाख रुपये) भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.