हॉटेलच्या रुममध्ये घुसला कोब्रा, झोपताना मानेजवळ रेंगाळत होता, व्हिडीओ व्हायरल

एका कपल थायलंडला फिरायला गेले असताना त्यांना भयानक अनुभव आला. त्यांच्या हॉटेलच्या बेडरुममध्ये चक्क कोब्रा शिरल्याने त्यांची पाचावर धारण बसली. अखेर त्या रात्री नेमके काय घडले ते पाहूयात...

हॉटेलच्या रुममध्ये घुसला कोब्रा, झोपताना मानेजवळ रेंगाळत होता, व्हिडीओ व्हायरल
COBRA IN HOTEL
| Updated on: Mar 31, 2026 | 6:10 PM

थायलंडच्या टुरवर गेलेले एक कपल ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, तेथे एका रुमच्या बेडरुममधून एक विषारी कोब्रा निघाल्याने ते प्रचंड घाबरले. ही घटना थायलंडच्या क्राबी या प्रसिद्ध शहरात घडली आहे. हे शहर थायलंडच्या दक्षिण भागात असून अंदमान समुद्र किनाऱ्याजवळ स्थित आहे. येथील एका हॉटेलमध्ये अचानक बेडरुममध्ये हा विषारी क्रोबा निघाल्याने हे कपल प्रचंड घाबरले.

फेसबुक युजर कन्नुत्ताकोर्न उत्तारानाक्रोन यांनी त्यांच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रसंग त्याने समाजमाध्यमावर शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ५ वाजता त्यांच्या पार्टनरने अचानक किंचाळून बिछान्यावरुन उडी मारली आणि त्याने सांगितले की रुममध्ये साप शिरला आहे.

स्थानिक वेबसाईट पटाया मेलच्या बातमीनुसार सुरुवातीला त्यांना वाटले की हा कोणतातरी भास असावा. किंवा झोपेत असल्याने आपल्याला काही वळवळल्यासारखे वाटले असावे. परंतू काही मिनिटांत सत्य समोर दिसले. रुममध्ये एका मोठा काळा नाग कोब्रा हजर आहे.

सर्वात आश्चर्यचकीत गोष्ट हा साप केवळ पलंगापर्यंत आला नव्हता तर कपल झोपले असताना त्यांचा शरीराच्या जवळ पोहचला होता. एवढेच काय हा साप त्यांच्या गळ्याच्या जवळ पोहचला होता.

पाहा व्हायरल व्हिडीओ –

कपलच्या मते साप त्यांच्या मानेजवळ रेंगाळत होता. त्यावेळी त्यांची अवस्था किती वाईट झाली असेल याचा विचार करुनच त्यावेळी त्यांची अवस्था काय वाईट झाली असले. पण, दिलासा देणारी बाब म्हणजे हा इतका खतरनाक स्थिती असूनही साप कोणाला चावला नाही. परंतू या घटनेने या कपल मोठा धक्का बसला आहे. हा खूपच घाबरवणारा आणि ट्रॉमेटीक अनुभव होता असे या कपलने सांगितले.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत हॉटेलच्या खोलीत कोब्रा स्पष्ट दिसत नाही. यानंतर लोकांनी हॉटेलच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. अनेक युजर्स म्हटले आहे की अनेक हॉटेल हे नैसर्गिक जंगलाच्या जवळ असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा प्रतिकार करण्याची व्यवस्था केली पाहिजे. या घटनेमुळे हे स्पष्ट होते की आपण जेव्हा नैसर्गिक पर्यटनाला जात असतो तेव्हा अशा प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. आणि थोड्याशी निष्काळजीपणामुळे जीवावर देखील बेतू शकते.

Follow Us