नाग मेल्यावर नागीण 24 तास मृतदेहाजवळ बसून राहिली अन्…; नंतर जे घडलं आश्चर्यचकीत करणारं

सापांसंबंधीत एक अशी घटना समोर आली आहे जी क्वचितच कधी कोणी पाहिली असेल. आता नेमकं काय झालं होतं जाणून घ्या...

नाग मेल्यावर नागीण 24 तास मृतदेहाजवळ बसून राहिली अन्...; नंतर जे घडलं आश्चर्यचकीत करणारं
Snake
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 01, 2025 | 2:22 PM

मुरैना येथे एक अशी घटना घडली, जी पहिल्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण, ही घटना 100 टक्के खरी आहे. एक नाग रस्ता ओलांडत होता, तेव्हा एका वाहनाने त्याला चिरडलं आणि त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवला. काही वेळानंतर एक नागिण तिथे आली. तिने नागाला या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या मृतदेहाजवळ बसली. ती 24 तास तिथेच बसून राहिली. त्यानंतर तिने जे केलं, त्याने संपूर्ण गावकरी चकीत झाले.

प्रेम आणि समर्पणाची कहाणी

माणसांमधील प्रेम आणि समर्पणाच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. एकमेकांच्या प्रेमासाठी जीवही दिल्याच्या घटना आजही घडतात. पण, प्राण्यांमध्ये असं प्रेम दिसणं दुर्मिळ आहे. मात्र, पहाडगड विकासखंडातील धूरकूड़ा कॉलनीत असा एक जिवंत दाखला समोर आला. येथे नाग-नागिणीच्या मार्मिक प्रेमकथेने सर्वांना भावूक केलं. ही घटना सिद्ध करते की, नाग-नागिणीमध्ये प्रेम असणं ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर सत्य आहे. शेकडो गावकरी स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत.

वाचा: हार्ट फेल होण्याआधी शरीर महिनाभर आधी कोणते संकेत देतात? जाणून घ्या 7 लक्षणे

नागिणी येऊन बसली सापाजवळ

गुरुवारी धूरकूड़ा कॉलनीजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नागाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी सुरुवातीला ही एक सामान्य घटना समजली आणि मृत नागाला रस्त्यावरून बाजूला केलं. पण, ही घटना तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली, जेव्हा काही वेळातच तिथे एक नागिण आली आणि मृत नागाजवळ बसून राहिली.

24 तासांनंतर स्वतःचाही मृत्यू

प्रत्यक्षदर्शींच्या मते, नागिण सुमारे 24 तास त्या जागी अतिशय शांत अवस्थेत बसून राहिली, जणू ती आपल्या साथीदाराला अंतिम निरोप देत होती. शेवटी तिनेही त्या जागीच आपले प्राण सोडले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून कॉलनीतील रहिवासी थक्क झाले. स्थानिकांचं म्हणणं आहे की, नागाच्या मृत्यूनंतर नागिण पूर्णपणे शांत दिसत होती. ती ना हलली, ना कुठे गेली. फक्त मृत नागाजवळच बसून राहिली. जेव्हा गावकऱ्यांना नागिणही मृत अवस्थेत सापडली, तेव्हा सर्वजण चकीत झाले.

गावकरी बनवणार प्रेमाची निशाणी

यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन दोघांवर अंत्य संस्कार केले. सनातन धर्मात नाग-नागिणीला अत्यंत पूजनीय मानलं जातं. या श्रद्धेने प्रेरित होऊन गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की, नाग-नागिणीच्या स्मरणार्थ त्या जागी एक चबूतरा बांधला जाईल. हा चबूतरा त्यांच्या अमर प्रेमाचं प्रतीक म्हणून राहील.

भारतीय लोककथा आणि मान्यता

भारतीय लोककथा, पौराणिक कथा आणि धार्मिक पुराणांमध्ये नाग व नागिण यांना एकमेकांप्रती समर्पित आणि प्रेमळ जोडपं म्हणून दाखवण्यात येतं. यासंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. या कथांमध्ये नाग आणि नागिण यांचं नातं खूप एकष्ठ मानलं जातं. अनेक कथांमध्ये त्यांना एकमेकांसाठी बलिदान देताना किंवा सूड घेताना दाखवण्यात येतं. लोककथांनुसार, असं मानलं जातं की जर नाग किंवा नागिण यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा सूड घेण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः नागिण आपल्या साथीदार नागाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी माणसांचा किंवा इतर प्राण्यांचा पाठलाग करते, असं दाखवण्यात येतं. किंवा अनेकदा नागाच्या मृत्यूनंतर नागिणीचीहा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येते. ही घटना याची साक्षीदार आहे.