Viral Video: मगर किती भयानक असते याचा अंदाज येईल, हा व्हिडीओ बघा!

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी सिंह किंवा वाघांची शिकार करताना दिसतात. आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे.

Viral Video: मगर किती भयानक असते याचा अंदाज येईल, हा व्हिडीओ बघा!
Crocodile Big Fish Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 14, 2022 | 4:17 PM

जगात भयानक प्राण्यांची (Animals) कमतरता नाही. सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता, मगरी इत्यादीं प्राणी धोकादायक प्राण्यांमध्ये होते, ज्यांना माणसाचा ‘शत्रू’ म्हणता येईल, कारण ते मांसाहारी प्राणी आहेत. कोणताही प्राणी दिसला की ते त्याला फाडून खाऊ शकतात. आपणही अशा प्राण्यांची भनक जरी लागली आजूबाजूला कधी तरी घाबरतो. विशेषत: मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये (Crocodile) सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही (Viral Video) तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी सिंह किंवा वाघांची शिकार करताना दिसतात. आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे.

या व्हिडीओमध्ये एक महाकाय मगर मोठा मासा आधी जमिनीवर आदळते नंतर ती तो मासा गिळून सुद्धा टाकते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका महाकाय माशाची शिकार केलीये, तिने त्या माशाला तोंडात धरून ठेवलंय. इतकं घट्ट पकडलंय की मगरीला हालता सुद्धा येत नाहीये.

मगर त्या माशाला आधी जमिनीवर फेकून देतो. मग मासा बेशुद्ध होतो. जेव्हा मगरीला खात्री पटते की, मासा मेला आहे, तेव्हा ती आरामात त्याला गिळून टाकते.

मगरीने एका झटक्यात मासा गिळला, पाहा…

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @natureisbruta1 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.

15 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 67 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय, शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केलाय. लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका यूजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, “या मगरीला पिण्यासाठी पेप्सी द्या”, मग दुसऱ्या युजरला प्रश्न पडला आहे की, “तो खात असलेली व्यक्ती इलेक्ट्रिक ईल फिश आहे का?”. अशातच आणखी एका युझरने कमेंट केली की, ‘मला वाटतं हा एकमेव प्राणी आहे जो सर्वकाही खातो’.