Video : तुम्ही कधी घोड्याला रडताना पाहिलंय का? रडणारा घोडा व्हायरल

आता सोशल मीडियावर एका अशा इमोशनल घोड्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो चक्क अश्रू गाळत रडतोय.

Video : तुम्ही कधी घोड्याला रडताना पाहिलंय का? रडणारा घोडा व्हायरल
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 11:03 PM

तुम्ही अनेक इमोशनल माणसे पाहिली असतील, आपण अनेकदा माणसांना रडतानाही पाहतो मात्र प्रण्यांना कधी रडताना पहात नाही, आता सोशल मीडियावर एका अशा इमोशनल घोड्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो चक्क अश्रू गाळत हुबेहूब माणसांसारखे रडतोय. माणसांना आपली व्यथा सांगता येते, मोकळेपणाने व्यक्त होता येते, मात्र प्रण्यांना त्यांची व्यथा सांगता येत नाही, ते त्यांच्या हवभावातूनच व्यक्त होतात. तसाच हा इमोशनल घोडा आपल्या अश्रद्वारे आपल्या भावनांना वाचा फोडताना दिसून येत आहे.

या छोट्याशा व्हिडीओनं नेटकऱ्यांना भारावून सोडलंय, त्यामुळेच नेटिझन्सदेखील इमोशनल झाले आहेत. मात्र हा घोडा का रडतोय?, त्याची नेमकी व्यथा काय? असे अनेक सवाल नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. तशा कमेंट या व्हिडिओखाली पहायला मिळत आहेत. हा भावूक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hepgul5 या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखभर लोकांनी पाहिला आहे आणि या व्हिडिओला प्रतिसादही दिला आहे.

व्हिडिओ पाहून नेटकरी इमोशनल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी उभा राहिलंय. या व्हिडिओ रुग्णलयातील आहे, घोड्यावर बहुतेक उपचार सुरू असावेत, तो अजारी असावा असा कयास सध्या नेटकरी लावत आहेत. या घोड्याच्या वेदना पाहवत नाहीत, कृपया त्याला तातडीनं मुक्त करा, असेही काहीजण व्यक्त होत आहेत. अनेकांनी घोड्याच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्याच्या या वेदना पाहून लोकांच्या संवेदना आपसूकच जाग्या झाल्या आहेत.

Jammu Kashmir : वैष्णो देवीची यात्रा 6 जानेवारीपर्यंत स्थगित, नेमकं कारण काय?

Nanded Crime: नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या

IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी