CUET Exam Viral: परीक्षेत गोंधळ! पेपर द्यायला गेले, परीक्षा केंद्रावर SORRY ची नोटीस, फोटो व्हायरल

| Updated on: Aug 04, 2022 | 4:19 PM

एनटीएने सकाळीच केरळमधील क्युईटी यूजी (CUET UG) परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस बजावली होती. ज्यानंतर आता एनटीएने नोएडा सेक्टर 64 मधील केंद्रावर परीक्षा पुढे ढकलली आहे. विद्यार्थ्यांनी एनटीएची कारवाई बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.

CUET Exam Viral: परीक्षेत गोंधळ! पेपर द्यायला गेले, परीक्षा केंद्रावर SORRY ची नोटीस, फोटो व्हायरल
CUET PG Answer Key
Image Credit source: Social Media
Follow us on

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (Common University Entrance Test) अंडरग्रॅज्युएटचा दुसरा टप्पा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला होता. पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे अडचणींना सामोरे जावे लागले. काही विद्यार्थ्यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या केंद्रावर सर्व्हरची समस्या उद्भवल्यानंतर शेवटच्या क्षणी त्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. एनटीएने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. एनटीएने सकाळीच केरळमधील क्युईटी यूजी (CUET UG) परीक्षा पुढे ढकलण्याची नोटीस बजावली होती. ज्यानंतर आता एनटीएने नोएडा सेक्टर 64 मधील केंद्रावर परीक्षा पुढे ढकलली आहे. विद्यार्थ्यांनी एनटीएची कारवाई बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.

पेपर द्यायला गेले, परीक्षा केंद्रावर SORRY ची नोटीस

विद्यार्थ्यांनी सांगितले की, जेव्हा ते सीयूईटी यूजी 2022 परीक्षेसाठी नोएडा सेक्टर 64 मधील एका केंद्रावर गेले, तेव्हा त्यांनी पाहिले की परीक्षा रद्द करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर कोणतीही अधिकृत नोटीस बजावण्यात आली नाही. परीक्षा पुढे ढकलल्याचा फटका सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना बसला आहे. या परीक्षा 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अधिकृत तारीख अद्याप समोर आली नसली तरी विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच तारखा जाहीर केल्या जातील, असं एनटीएने म्हटलं आहे.

विद्यार्थी आपल्या अडचणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत

त्याचवेळी आणखी एका विद्यार्थ्याने परीक्षेबाबत सांगितले की, मी वेळेवर केंद्रावर पोहोचलो आणि जागेवरच आम्हाला परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. परीक्षा केंद्रावर नोटीस चिकटवण्यात आली होती, विद्यार्थ्यांना यापूर्वी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा केंद्रावरच थांबावे लागले, नंतर परीक्षा रद्द करण्यात आली, असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थीही सोशल मीडियावर आपल्या अडचणी शेअर करत आहेत. विद्यार्थ्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.