AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वय वर्षे 1, वर्ल्ड रेकॉर्ड 3, देशाची राजधानी आणि ध्वज ओळखण्यात नंबर एक!, चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून लोक अवाक…

मध्यप्रदेशातील रीवा इथे राहणाऱ्या यशस्वी मिश्राने अवघ्या 1 वर्ष 4 महिन्यांच्या वयात वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 'लिटल गुगल बॉय' या नावाने सध्या तिला ओळखलं जाऊ लागलं आहे.

वय वर्षे 1, वर्ल्ड रेकॉर्ड 3, देशाची राजधानी आणि ध्वज ओळखण्यात नंबर एक!, चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून लोक अवाक...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 28, 2022 | 10:56 AM
Share

मुंबई : एका वर्षाचं लहान मुल काय करू शकतं? याचं सर्वसामान्य उत्तर त्याच्या बालपणाला अनुसरून तो वागेल. तो हळूहळू बोलायला लागेल. त्याचं बालपण इन्जॉय करेल. पण काहीजण या सगळ्याला अपवाद असतात. अश्याच एका चिमुकल्याची गोष्ट सध्या व्हायरल (viral News) होत आहे. या चिमुकल्याच्या नावावर चक्क तीन वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. मध्यप्रदेशातील रीवा इथे राहणाऱ्या यशस्वी मिश्राने अवघ्या 1 वर्ष 4 महिन्यांच्या वयात वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यशस्वीने एक वर्ष वयात एवढी प्रगल्भता दाखवली आहे. जी भल्या भल्यांना जमणार नाही. ‘लिटल गुगल बॉय’ (Little Google Boy) या नावाने सध्या तिला ओळखलं जाऊ लागलं आहे.

रेकॉर्ड काय आहे?

यशस्वीने एक वर्ष आणि चार महिन्याच्या वयात 195 देशांची आणि त्यांच्या राजधान्यांची नावे लक्षात ठेवून विश्वविक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञानाची, प्रगल्भतेची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.पण यशस्वीने असा विक्रम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी या छोट्या गुगल बॉयने वयाच्या 1 वर्ष 2 महिन्यांत 26 देशांचे राष्ट्रध्वज ओळखून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. असा रेकॉर्ड करणारा तो जगातील सर्वात लहान मुलगा आहे.

यशस्‍वीच्‍या नावाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्‍समध्‍येही नोंद आहे. सर्वात कमी वयात त्याने ही कामगिरी केली आहे. यशस्वीच्या नावावर आतापर्यंत तीन विक्रम नोंद आहेत. इतक्या कमी वयात त्याने हे यश मिळवलंय. यशस्‍वीचे कुटुंबीय त्‍याच्‍या यशाने खूप खूश आहेत. “आमचा मुलगा एवढ्या लहान वयात जे काम करतोय ते पाहून आम्ही खूप जास्त आनंदी आहोत. आम्हाला त्याच्या कामाचा आनंद आहे. यशस्वीच्या नावाने आम्हाला ओळखलं जातं यापेक्षा आनंदाची बाब काय असणार? आम्हाला त्याचा अभिमान आहे”, असं त्याचे आई-वडील सांगतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?