Video | चित्त्याच्या समोरून माणसाने खेचली शिकार, चवताळलेल्या चित्त्याने काय केले? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!

सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चित्त्याच्या समोरून त्याने केलेली शिकार घेऊन जात आहे. व्हिडिओमध्ये चित्त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.

Video | चित्त्याच्या समोरून माणसाने खेचली शिकार, चवताळलेल्या चित्त्याने काय केले? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!
चित्ता
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 11:21 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चित्त्याच्या समोरून त्याने केलेली शिकार घेऊन जात आहे. व्हिडिओमध्ये चित्त्याच्या (Cheetah) चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. हा व्हिडीओ बघितल्यानंतर यूजर्स आश्चर्यचकित आहेत की, त्या व्यक्तीमध्ये एवढी हिंमत कुठून आली, ज्याने चित्याच्या समोरून त्याचे अन्न हिसकावून घेण्याचे धाडस केले.

चित्त्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे. मात्र सोशल मीडिया यूजर्स तो पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जंगलात एक चित्ता त्याच्या मृत शिकारजवळ उभा आहे. मात्र, एक व्यक्ती येते आणि मृत हरणाला ओढून नेऊ लागते. हे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण व्हिडीओमध्ये तर हेच दिसते आहे. ज्यावेळेला ही व्यक्ती चित्त्याची शिकार घेऊन जात आहे, त्यावेळी चित्ता अतिशय चिडलेला आहे.

हा व्हिडिओ क्लिप 12 चित्यांच्या शॉर्ट फिल्मचा भाग आहे. दिग्दर्शक Sean Viljoen ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही लवकरच 12 चित्तांवर एक शॉर्ट फिल्म रिलीज करणार आहोत. 20 डिसेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अनेक यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या : 

Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?

Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात ‘हे’ पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!