Jantar Mantar Video: हट्ट करत तरुण पोलिसांच्या गाडीत तर घुसला, पण त्यानंतर जे झालं ते हैराण करणारं

Jantar Mantar Video: दिल्ली येथे जंतरमंतर येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात एक तरुण स्वतः पोलिसांकडे आला आणि मला देखील गाडीत बसवा... असं सांगू लागला, पण त्यानंतर जे काही झालं ते थक्क करणारं होत...

Jantar Mantar Video: हट्ट करत तरुण पोलिसांच्या गाडीत तर घुसला, पण त्यानंतर जे झालं ते हैराण करणारं
| Updated on: Oct 06, 2026 | 2:50 PM

Jantar Mantar Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. सध्या दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. आधी देखील जेन झी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता देखील दिल्लीत आंदोलन सुरु आहे… आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या एक व्हिडीओ सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे… सांगायचं झालं तर, जंतरमंतरवर आंदोलन सुरु होतं आणि पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत होते, आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत होते. यासाठी बस देखील तयार होत्या. तेव्हा एक तरुण आंदोलक पोलिसांकडे आला आणि त्यांनी पोलिसांकडे मला पण तुमच्या गाडीत टाका असं हट्ट करु लागला. अनुज भगत असं विद्यार्थी आंदोलकाचं नाव आहे.

तरुण पोलिसांना बोलत होता, ”सर, मित्र माझ्यापासून लांब होतील…’ व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनुज अत्यंत निरागसपणे पोलिसांना भावनिक विनंती करत आहे- सर, आम्ही तीन मित्र एकत्र आलोय. मी इथे मागे राहिलो तर एकटा कुठे जाईन? कृपया मलाही आत जाऊ द्या ना. पोलीस देखील अनुज याचं ऐकतात आणि त्याला देखील बसमध्ये जाण्याचा परवानगी देली. त्यानंतर अनुज देखील मोठ्या उत्साहात बसमध्ये बसला…

Loading...

 

 

पण बसमध्ये पोहोचल्यानंतर समोरची परिस्थीती काही वेगळीच होती. ज्या मित्रांसाठी अनुज पोलिसांच्या गाडीत बंद झाला, ते मित्र इमरजेंसी गेटने पळून गेले… आता अनुज याला फक्त रिकाम्या सीट दिसत होत्या… त्याने मित्रांना बाहेर पळताना पाहिलं आणि त्याला धक्कात बसला… त्यानंतर अनुज पुन्हा पोलिसांना म्हणाला, ‘माझे मित्र बाहेर पळून गेले आहेत, मला पाण जाऊद्या… ‘

त्यानंतर, महिला पोलिस कर्मचाऱ्याने बसचा दरवाजा बंद केला. आता अनुज आणि इतर आंदोलक त्यांच्यावर हसत म्हणाले- अरे भावा, घाबरतो कशाला? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत, कुठेही जाऊ देणार नाही. 1 मिनिट 4 सेकंदाच्या हा व्हिडिओ क्लिपवर इंटरनेट तुफान व्हायरल होत आहे . एका युजरने लिहिलं, भाऊ पिकनिकला थोडी चालला होता की जो स्वतःच पोलिसांच्या गाडीत शिरला. दुसऱ्याने म्हटलं, जेव्हा असे मित्र असतात तेव्हा शत्रूची काय गरज?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us