AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Metro Video | करायला गेला एक, झालं एक! दिल्ली मेट्रो मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल

दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण हा व्हिडीओ जरा वेगळा आहे कारण हा व्हिडीओ एक फ्लॉप स्टंट आहे. व्हायरल होण्यासाठी यात स्टंट केला गेलाय खरं पण तोच फेल झालाय. दिल्ली मेट्रो नेहमी चर्चेत असते, यात शूट केले जाणारे व्हिडीओ याला कारणीभूत आहेत. प्रत्येक आठवड्याला यातला एक नवा व्हिडीओ व्हायरल होतो. हा व्हिडीओ बघा तुम्ही खूप हसाल.

Delhi Metro Video | करायला गेला एक, झालं एक! दिल्ली मेट्रो मधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल
delhi metro stuntImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 23, 2023 | 11:22 AM
Share

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो एक चर्चेचा विषय आहे. एवढी कुठल्याही गोष्टीची चर्चा होत नसेल जेवढी दिल्ली मेट्रोची होते. सोशल मीडियावर या मेट्रोमधील व्हिडीओ खूप व्हायरल होतायत. दिल्ली मेट्रो मधील असे अनेक व्हिडीओ तुमच्या पाहण्यात आले असतील. कधी लोकं यात डान्स करतात, कधी गाणं म्हणतात, कधी तर फॅशन शो सुद्धा करतात. काही दिवसांपूर्वी तर नागपूर मेट्रोचा सुद्धा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात फॅशन वॉक करण्यात आला होता. दिल्ली मेट्रोच्या व्हायरल व्हिडीओने तर देशभरात धुमाकूळ घातलाय. प्रत्येक आठवड्यात या मेट्रोमधला एक व्हिडीओ व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय पण हा जरा वेगळा आहे. वेगळा कसा? या व्हिडीओ मध्ये एक मुलगा व्हिडीओ बनवायला जातो पण तो फेल होतो.

काय आहे व्हिडीओ मध्ये बघा…

View this post on Instagram

A post shared by chaman flipper (@chaman_flipper)

स्टंट मारताना व्हिडीओ काढायचा होता

हा मुलगा बघा, या मुलाला दिल्ली मेट्रोमध्ये स्टंट मारताना व्हिडीओ काढायचा होता म्हणजे तो व्हायरल होईल. पण तो स्टंट मारायला गेला आणि अपयशी ठरला. व्हिडीओ बघून तुम्हाला खूप हसू येईल. व्हिडिओमध्ये हा मुलगा बॅकफ्लिप मारण्याच्या तयारीत असतो, तो पोझ देतो आणि बॅकफ्लिप मारणार एवढ्यात तो डोक्यावर आदळतो. आधी तो इतका आत्मविश्वासाने स्टंट मारायला जातो त्याला बघताना आपल्यालाही वाटत नाही की तो डोक्यावर पडेल पण तो खूप जोरात पडतो. विशेष म्हणजे या व्हिडीओ मध्ये मागे जे प्रवासी बसलेले आहेत ते सुद्धा या मुलाच्या स्टंटकडे लक्ष देत नाहीत कदाचित दिल्ली मेट्रोचा हा नेहमीचाच प्रकार असल्यानं त्यांना लक्ष द्यावं असं वाटलंब नसेल.

तुम्ही सुद्धा खूप हसाल

chaman_flipper नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ दहा लाख लोकांनी पाहिलाय. 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. यावर खूप लोकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. काही लोकं म्हणतायत, “भावा येत नाही तर कशाला स्टंट मारतोय, लागली ना वाट?”, एकजण कमेंट करून म्हणतोय, “ठीके, ठीके, जर स्टंट चांगला झाला असता तर इतका व्हायरल नसता झाला. एकाने लिहिलं, ‘खोपड़ी फटे तो फटे पर नवाबी ना घटे’. व्हिडीओ बघताना तुम्ही सुद्धा खूप हसाल, कारण आधी कुणालाच वाटत नाही की या व्हिडिओमध्ये पुढे असं काही होणारे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.