
देसी जुगाडाच्या बाबतीत आपल्या भारतीयांचा कोणीही हात पकडू शकत नाही. देशात एकापेक्षा एक हुशार लोक आहेत, जे दररोज सोशल मीडियाद्वारे आपल्या अनोख्या जुगाडाने जगाला थक्क करतात. सध्या, असाच एक व्हिडीओ पाहून नेटिझन्स चक्रावून गेले आहेत. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने गजब देसी जुगाड दाखवला आहे. या व्यक्तीने आपल्या खाटेलाच चार चाकी गाडी (माणूस खाटेला कार बनवतो) बनवली आहे. तुम्हीही हा रंजक व्हिडीओ एकदा नक्की पाहा…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गावच्या रस्त्यांवर जुगाड करुन बनवलेली अनोखी गाडी चालवताना दिसत आहे. ही गाडी बनवण्यासाठी त्या व्यक्तीने एका खाटेचा वापर केला आहे. यामध्ये इंजिन, स्टीयरिंग, हेडलाइट आणि आरामदायक गादी देखील वापरली आहे. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे या जुगाड करुन बनवलेल्या गाडीत फक्त ड्रायव्हरच नाही, तर अनेक लोकही बसलेले आहेत.
वाचा: अंकिता वालावलकरने सांगितलं सूरज चव्हाणच्या लग्नाचं सत्य, नेमकं काय म्हणाली?
पूरा कार कंपनी में डर का माहौल है, अमेरिका क्या कहता था?😂🤣🔥 pic.twitter.com/SKcdn07qr1
— Toofan Ojha (@RealTofanOjha) September 21, 2025
ही अनोखी गाडी कशी बनली?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खाटेच्या मध्यभागी स्टीयरिंग लावलेले आहे आणि त्याखाली इंजिन, अॅक्सेलेटर आणि ब्रेक पॅनेल बसवले आहेत. तसेच, या अनोख्या वाहनाला गाडीसारखा लूक देण्यासाठी टिन शीट आणि हेडलाइटही लावली आहे. हा देसी जुगाड इतका अप्रतिम आहे की इंटरनेटवरील लोकांना विश्वासच बसत नाही की एका खाटेपासून इतकी शानदार गाडी बनवता येते.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर @RealTofanOjha या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे 3 लाख वेळा पाहिला गेला आहे. तसेच, कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर टिप्पण्यांचा पाऊस पडला आहे. एका युजरने म्हटले, “आमच्या तंत्रज्ञानामुळे आज अमेरिकेला हेवा वाटत असेल.” दुसऱ्याने लिहिले, “हे पाहून कार कंपन्या तणावात आल्या असतील.” आणखी एका युजरने कमेंट करत म्हटले की, “एकापेक्षा एक प्रतिभावान लोक भरलेले आहेत.” आणखी एका युजरने म्हटले, “भावाने गजबचा जुगाड केला आहे, कदाचित मोटरसायकलपासून बनवला असेल.”